Type Here to Get Search Results !

Pune Crime: अखेर त्याने केला कुत्र्याचा खून; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

dog stabbed to death with knife in usmanapura - checkmate times

पुणे, दि. 5 मे 2023 (चेकमेट टाईम्स): सध्या पुणेच काय तर संपूर्ण महाराष्ट्रातच कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. दररोज कुठे ना कुठे कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडत असताना, तिकडे संभाजीनगरात (Sambhajinagar) मात्र कुत्र्याचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदरील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. मात्र ज्याने तो खून केला, त्याचे कारण काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर याच्या कारणापर्यंत जायला हवे, असे मत व्यक्त केले जाते आहे. (Attack on dog with knife)

हा पहा व्हिडीओ -

ही घटना शहरातील उस्मानपुरा (usmanpura) परिसरातील आहे. एका माथेफिरुने रस्त्याच्या कडेला शांतपणे उभा असलेल्या एका कुत्र्याला चाकूने भोसकून ठार (A dog was stabbed to death with knife) केले. ही मंगळवारी (दि. 2 मे 2023) रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. दुसऱ्या दिवशी श्वान रस्त्याच्या कडेस मृत आढळून आल्याने प्राणी प्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी आता वेदांत नगर पोलीस ठाण्यात (Vedant Nagr Police Station) प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ली भटक्या कुत्र्यास दगड मारणे, हाकलून देणे असे प्रकार वाढले आहेत. अन्नाच्या शोधात श्वान रस्त्यावर भटकत असताना अनेक भागांत दिसून येतात. फार कमीवेळा असे श्वान स्वत:हून हल्ला केल्याचा प्रकार शहरात घडले आहेत. (Pune Crime News)

पुण्यात मागच्या वर्षी असाच प्रकार एका कुत्र्याला मारहाण करून विष देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना मागील वर्षी पुण्यातील कोंढव्यात घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्रा सोसायटीत घुसल्याने या चार जणांना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांनी ठरवून कुत्र्याला विष पाजले आणि त्याला मारहाण केली. तक्रारदार ज्यावेळी चार जणांना समजावण्यासाठी आला. त्यावेळी त्यांनी तक्रारदार आणि त्याच्या आईला सुनावले आणि तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर हे कृत्य पाहून तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.