Type Here to Get Search Results !

Pune Crime: वनाझ मध्ये 33 लाखांचा घोटाळा; माजी अध्यक्षांसह 5 जणांवर गुन्हा दाखल

पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

kothrud polie station - checkmate times

पुणे, दि. 5 मे 2023 (चेकमेट टाईम्स): वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या (Vanaz Sahakari Gruh Rachana Sanstha) माजी अध्यक्षांसह 3 पदाधिकारी आणि 2 लेखा परिक्षकांविरूध्द 33 लाख 22 हजार 378 रूपयांचा अपहार (Embezzlement) केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

यासंदर्भात लेखा परिक्षक श्रेणी-1 प्रतिभा सुरेंद्र घोडके (51, रा. नालंदा हाऊसिंग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) (Pratibha Surendra Ghodke) यांनी फिर्याद दिली आहे. सदरील गुन्हा हा सन 2014-15 ते सन 2018-19 दरम्यान वनाज सहकारी संस्था (वनाज कंपनीजवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे) येथे घडला आहे.

माजी अध्यक्ष दीपक चव्हाण, माजी सचिव नितीन सुर्वे, माजी खजिनदार प्रकाश सोलकर (सर्व रा. वनाज सोसायटी, कोथरूड, पुणे), लेखा परिक्षक एम. आर. सलगर (रा. साडे सतरा नळी, हडपसर, पुणे) आणि लेखा परिक्षक धनश्री रत्नाळीकर (रा. पाषाण, पुणे) यांच्याविरूध्द भांदवि 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) (Deepak Chavan, Nitin Surve, Prakash Solkar, M. R. Salgar, Dhanshree Ratnalikar)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी वनाज सहकारी गृह रचना संस्थेचे पदाधिकारी असताना 33 लाख 22 हजार 387 रूपये रक्कमेचा अधिकारात बेकायदेशीर गैरवापर केला. त्यांनी रक्कमेचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केला. रक्कमेचा अपहार झाल्याचे संस्थेच्या अभिलेखावर असताना सन 2014-15 ते सन 2018-19 च्या दरम्यान लेखा परिक्षण करणारे लेखा परिक्षक सलगर आणि रत्नाळीकर यांनी खरी व वास्त परिस्थिती व आर्थिक बाबी त्यांचे लेखा परिक्षण अहवालात न मांडता वनाज संस्थेचे नमूद पदाधिकारी आरोपी यांनी केलेल्या अपहारास संगनमताने सहाय्यक केले आहे.

पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Sr PI Hemant Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड पोलीस गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.