Type Here to Get Search Results !

Pune Crime: बनावट विमा एजंट टोळीप्रमुख ताब्यात; पुण्यातील डॉक्टरला 2 कोटींना घातला होता गंडा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

fraud insurance agent arrested - checkmate times

पुणे, दि. 12 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) शहरातील एका नामांकित डॉक्टरला विमा पॉलिसी देण्याच्या बहाण्याने दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Insurance Policy Fraud) केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. या संदर्भात तक्रारदार यांनी फिर्याद दिल्यावरून पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याच्या तपासात आरोपीने वापरलेले बँक अकाऊंट डिटेल्स, मोबाईल नंबर, व्हॉट्सअॅप क्रमांक संबंधित कंपन्यांकडून माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीचा शोध घेण्यात आला. शहवान पुत्र सलीम अहमद (रा. लक्ष्मीनगर, दिल्ली) (Shahwan son Salim Ahmed) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या गुन्ह्यात यापूर्वी संदीप कुमार पुत्र धर्मपाल (रा. लक्ष्मीनगर गार्डन, लोणी, गाझियाबाद) (Sandeep Kumar son of Dharmapala), साहब खान पुत्र नसीर अली (रा. पिढौना, कासगंज) (Sahab Khan son of Nasir Ali) आणि तुआजिब खान पुत्र आकील अहमद (रा. विढौणा, कासगंज) (Tuajib Khan son of Aqeel Ahmed) या तिघांना अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सलीम अहमद हा आग्रा, उत्तर प्रदेश येथील सायबर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला पुणे सायबर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. न्यायालयाने त्याला 13 मे 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Pune Crime News)

पोलीस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले, वरिष्ठ निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा -

(Commissioner of Police Ritesh Kumar, Additional Commissioner of Police Crime Branch Ramnath Pokle, Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge, Assistant Commissioner Vijaykumar Palasule, Senior Inspector Meenal Supe-Patil and Inspector Chandrasekhar Sawant.)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.