Type Here to Get Search Results !

Hallmark Jewellary Fraud: पुण्यात हॉलमार्कसह बनावट सोन्याचे दागिने; तिने चक्क सराफांनाही घातला गंडा

पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत?

खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

hallmark jewellary crime in pune - checkmate times

पुणे, दि. 9 मे 2023 (चेकमेट टाईम्स): सोनं खरेदी करताना होलमार्क (hallmark) आहे की नाही हे तपासत असतांना होलमार्क असलेले दागिनेही बनावट (Fake Jewellary) असू शकण्याचे गुन्हे घडत आहेत. हॉलमार्क असलेले सोने घेऊन एक महिला आली. जुने सोने देऊन तिने दुसरा दागिना पसंत केला. हॉलमार्क असल्याने त्यावर विश्वास ठेवून सराफाने तिला नवीन दागिना दिला. प्रत्यक्षात तो बनावट निघाला. अशाच प्रकारे इतर सराफांनाही तिने फसविल्याचे (Fraud) लक्षात आले. (Pune Crime News)

याबाबत गणेश पेठेतील (Ganesh Peth) एका सराफाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. साक्षी अविनाश सोनी (वय 32, रा. प्रेमजी जीवन सेनोटेरियम, पुणे स्टेशन, मुळ इटारसी, जि. नर्मदापूर, मध्य प्रदेश) (Sakshi Avinash Soni) असे या महिलेचे नाव आहे.

हा प्रकार घडत असल्याची माहिती व्हॉटसॲपमार्फत सर्व सराफांपर्यंत पोहचविली गेली होती. ती पुन्हा कस्तुरे चौकातील एका सराफी दुकानात फसवणूक करण्यासाठी गेली असताना सापडली आणि पोलिसांनी तिला अटक केली. (Pune Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचे कस्तुरे चौकात (Kasture Chowk) सराफ दुकान आहे. त्यांच्या व्हॉटसॲपवर सराफांच्या ग्रुपवर दोन महिन्यांपूर्वी एक महिला बनावट दागिने देऊन नवे दागिने घेऊन जात असल्याची माहिती व तिचा फोटो दिला होता. तेव्हा फिर्यादी यांना आपल्याकडेही या महिलेने बनावट दागिने दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती सर्व कामगारांना देऊन ठेवली होती. ही महिला शनिवारी (दि. 6 मे 2023) त्याच्या दुकानात पुन्हा आली. तिने सोन्याची बनावट सोनसाखळी आणली होती. त्यावर हॉलमार्कचे चिन्ह होते. ही चैन देऊन तिला सोन्याचे मंगळसुत्र खरेदी करायचे होते. फिर्यादी यांना हा प्रकार लक्षात आला.

दरम्यान, त्यांनी या महिलेला बोलण्यात गुंतवले. त्या सोनसाखळीचा तुकडा करुन तो टेस्टिंगला पाठविला. तेव्हा टेस्टिंगचा रिपोर्ट 22 कॅरेट येणे अपेक्षित असताना केवळ 5 कॅरेट आला. तिने तांब्याच्या तारेवर सोन्याचा मुलामा दिला असल्याचे आढळून आले. त्यांनी पोलिसांना सावध केले. पोलिसांनी तातडीने या सराफाचे दुकान गाठून महिलेला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग (Sub-Inspector of Police Rahul Jog) तपास करीत आहेत. (Pune Crime News)

बनावट दागिन्यांवर हॉलमार्क कसे याबाबत दत्तात्रय देवकर (Dattatray Devkar) यांनी सांगितले की,”यापूर्वी अनेक जण लेझर मशीनवर टेस्टिंग करुन त्याचे प्रमाणपत्र घेत असत. अशा वेळी अचूक टेस्टिंग केले नाही तर चुकीचे प्रमाणपत्र मिळत होते. आता मात्र नव्या नियमामुळे हा प्रकार बंद होणार आहे.”

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.