Type Here to Get Search Results !

Daund Crime: पत्रकारावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Attack on journalist vinod gaikwad in daund - checkmate times

पुणे, दि. 3 मे 2023 (चेकमेट टाईम्स): दौंड तालुक्यातील (Daund) लोकशाही न्यूज चॅनलचे (Lokshahi News Channel) पत्रकार विनोद गायकवाड (Journalist Vinod Gaikwad) यांच्यावर दोन दिवसापूर्वी लग्न विवाह समारंभाच्या कार्यक्रमात पाच - सहा जणांनी बातम्या दिल्याचा राग धरून हल्ला केल्याची घटना घडली होती. (Pune Crime News)

या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station) पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत साहिल रामदास गायकवाड, शुभम भानोबा गायकवाड, सत्यम भानोबा गायकवाड, स्वप्निल रामदास गायकवाड, गणेश लिंबाजी गायकवाड (सर्व रा. कुसेगाव, तालुका दौंड जिल्हा, पुणे) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sahil Ramdas Gaikwad, Shubham Bhanoba Gaikwad, Satyam Bhanoba Gaikwad, Swapnil Ramdas Gaikwad, Ganesh Limbaji Gaikwad) (Pune Crime News)

पत्रकारावर हल्ला करणे, शिवीगाळ करणे मारहाण करणे या गंभीर गुन्ह्यांसाठी अजामीन पत्र गुन्हा आहे, पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी हा दौंड तालुक्यातील पहिलाच गुन्हा आहे.‌ ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (PI Hemant Shedge) यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील कुसेगाव (Kusegaon, Daund) येथील लोकशाही न्यूज चॅनलचे पत्रकार विनोद मनोहर गायकवाड हे 30 एप्रिल 2023 रोजी पाटस (Patas) येथील पंचरत्न मंगल कार्यालयामध्ये (Panchratna Mangal Karyalay) कुसेगाव येथील सतीश मधुकर गायकवाड यांच्या मुलीच्या लग्न समारंभासाठी गेले होते. ते लग्न मंडपातून जेवायला जात असतांना आरोपींनी दोन वर्षापुर्वी कुसेगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या वादाची बातमी केल्याचा राग मनामध्ये धरून शिवीगाळ करत ‘आज तुला सोडतच नाही, तु दोन वर्षापासून खोटया नाटया बातम्या देतोस, आज तुझी पत्रकारीताच काढतो’, असे म्हणुन हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शुभम गायकवाड याने हातातील कसल्यातरी धारधार हत्याराने डोक्यात मारहाण केली. (Pune Crime News)

हेही वाचा -

या आरोपींनी गायकवाड यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विनोद गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचार करण्यात आले.

या जीवघेण्या हल्ल्यातून विनोद गायकवाड हे बचावले असले तरी अतिशय गंभीर घटना आहे. या घटनेची गंभीर दखल घेत दौंडसह राज्यभरातील विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आणि आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नुकताच या प्रकरणी पाच जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.