Type Here to Get Search Results !

Leopard Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गतप्राण; सोलापूर रस्त्यावर घडलेली घटना

पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 4 मे 2023 (चेकमेट टाईम्स): एका बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची (leopard death after hitting with vehical) घटना मंगळवारी (दि. 2 मे 2023) रात्री पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसदेव जवळील काळेवाडी नंबर 2 (ता. इंदापूर) येथे (Kalewadi, Palasdev, Pune-Solpaur National Highway) घडली. अचानक रस्त्यावर बिबट्या आल्यानंतर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने तो काही काळ रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता.

हा पहा व्हिडीओ -


या घटनेनंतर रस्त्यावर वाहनांची व प्रवाशांची गर्दी झाली. भिगवणला कामानिमित्त गेलेले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार जाधव, सागर ढगे, शंकर भोंग यांनी तो कोणता प्राणी आहे, हे पाहण्यासाठी गर्दीकडे तातडीने धाव (Indapur Agricultural Produce Market Committee Director Tushar Jadhav, Sagar Dhage, Shankar Bhong) घेतली. त्यांना तो बिबट्या असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी वन विभागाशी (Forest Department) संपर्क करण्याचा प्रयत्न केला तसेच फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या (Friends of nature club) सदस्यांना ही माहिती दिली. त्यानंतर तातडीने त्या बिबट्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तो गतप्राण झाला होता.

मागील आठ दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयाच्या भीमा नदीकाठच्या पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाला स्थानिक नागरिकांनी दिली होती, असा दुजोरा इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी (Indapur Taluk Forest Officer Ajit Suryavanshi) यांनी दिला.

घटनास्थळी जाऊन पंचनामा करून त्या मृत बिबट्यास ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बिबट्याचा वावर मागील काही महिन्यांपासून इंदापूर तालुक्यात वाढल्याचे दिसून येत असतानाच अचानकपणे अपघातात बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने प्राणिप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.