Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 11 मे 2023 (चेकमेट टाईम्स): भागीदारी प्रकल्पात अटी व शर्तींचा भंग करून प्रकल्पातील भागीदाराची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी मार्वल सिग्मा होम्सचे (Marval Sigma Homes) विश्वजित सुभाष झंवर (रा. मार्वल रेसिडेन्सी, साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क) (Vishwajeet Subhash Zanwar) यांच्यासह फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
याबाबत निखिल प्रमोद (मगरपट्टा सिटी) (Nikhil Pramod) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यांना अॅड. हेमंत झंजाड (Adv. Hemant Zanjhad) यांनी कायदेशीर साहाय्य केले.
हडपसर येथील दोन जागामालक (प्रमोद मगर आणि संजय देसाई- Pramod Magar and Sanjay Desai) असलेली सहा एकर जागा डेव्हलपमेंटसाठी देण्याचे ठरल्यानंतर यासाठी मार्वल सिग्मा होम्सचे संचालक विश्वजित झंवर यांनी तयारी दर्शवली होती. त्या अनुषंगाने 29 नोव्हेंबर 2011 रोजी करार झाला. करारातील अटीतील मालकांचा हिस्सा 43 टक्के, तर झंवर यांचा हिस्सा 57 टक्के ठरला. या वेळी 13 व्या अटीमध्ये जमीनमालक किंवा बांधकाम व्यावसायिक हे कुठल्याही तिर्हाईत व्यक्ती किंवा संस्था याच्याबरोबर कुठलाही करारनामा करणार नाहीत, ज्यामुळे तिर्हाईत व्यक्ती तसेच सदरचा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता संपूर्ण आर्थिक निधी मार्वल सिग्मा होम्सचा असेल, असे नमूद केले होते. तसेच 36 महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरले. तसेच तिघा भागीदारांच्या नावाने मार्वल-मगर-देसाई प्रोजेक्ट नावाने अॅक्सिस बँकेत (AXIS Bank) खाते उघडले.
या प्रकल्पाबाबत काही निर्णय घेताना जागामालकांची संमतीदेखील घेणे आवश्यक होते. 22 मजली मजली इमारतीत 68 सदनिका बांधण्यास मंजुरी मिळाली. पुढे या प्रकल्पाला दिरंगाई झाली. त्यानंतर पुरवणी करारपत्र 2015 मध्ये करण्यात आले. त्यामध्ये मालकांचा 46 टक्के वाटा तर बांधकाम व्यावसायिक 54 टक्के वाटा असा करार झाला. वाढ दिलेल्या 36 महिन्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास मालकांचा हिस्सा एक टक्क्याने वाढेल असा पुरवणी करारनामा झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. (Pune Crime News)
दरम्यान, हा प्रकल्प जेव्हा रेरामध्ये (RERA) रजिस्टर करण्याची वेळ आली तेव्हा झंवर यांनी बांधकामावर एका वित्त कंपनीकडून 55 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे समजले. याबाबत मालकांनी विचारणा केल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तसेच लवकरच पैशाची परतफेड करणार असल्याची शाश्वती झंवर यांनी दिली. दरम्यान, या प्रकल्पाच्या अनुषंगाने अटी व शर्तींचा भंग झाल्यानंतर तब्बल 68 कोटी 39 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांना कायदेशीर मदत अॅड. हेमंत झंजाड करत आहेत.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84