मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 8, 2023
मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #milkhasingh
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 8 मे 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने रेल्वेच्या (MSRTC) ‘रेलनीर’ च्या धर्तीवर (Rail Neer, a branded packaged drinking water) राज्यातील बसस्थानके व आगारांमध्ये प्रवाशांकरिता ‘नाथजल’ या नावाने अधिकृतरीत्या बाटलीबंद पाणी (Nathjal Packaged Water) विक्री सुरू केली आहे.
परंतु, या योजनेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना संबंधित स्टॉलधारकांकडून प्रवाशांची अडवणूक होत आहे. ‘नाथजल’च्या एक लिटरच्या बाटलीची किंमत 15 रुपये असताना प्रत्यक्षात मात्र 20 रुपये घेतले जातात. ‘कुलिंग चार्ज’च्या नावाखाली एसटी प्रवाशांच्या होणार्या या लुटीकडे प्रशासकीय पातळीवरून मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
एसटी बसस्थानकामध्ये (ST Bus) या अगोदर लोकल ब्रँडचे बाटलीबंद पाणी अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये प्रवाशांना विकत घ्यावे लागायचे. या पाण्याची गुणवत्ता जेमतेम असल्यामुळे सहाजिकच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड व आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागायचा. मात्र, 2020 मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब (The then Transport Minister Anil Parab) यांच्या संकल्पनेतून ‘नाथजल’ या नावाने एसटी ने स्वतःच पाणी विक्री करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्राची संत परंपरा असलेल्या श्रेणीतील सर्वोच्च स्थानावरील संत एकनाथ महाराज यांच्या नावाने ही पाणी विक्री सुरू करण्यात आली. त्यासाठी पुण्यातील एका खासगी कंपनीला बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला. राज्यातील सर्व बसस्थानके व आगारांमध्ये टप्प्याटप्प्याने कंत्राटी पद्धतीने पाणी विक्रीचे स्टॉल सुरू करण्यात आले.
650 मिलिलिटर व 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये नाथजल विक्रीसाठी उपलब्ध असून, यांचा दर अनुक्रमे 10 रुपये व 15 रुपये इतका आहे. प्रत्येक 650 मिलिलिटर बाटलीबंद पाण्यामागे 45 पैसे आणि एक लिटर बाटलीबंद पाण्यामागे एक रुपया एसटीला मिळतो. मात्र, राज्यभरात अपवाद वगळता कोणत्याही स्टॉलवर ’नाथजल’ वरील निर्धारित किमतीत विक्री केली जात नाही.
सर्वाधिक मागणी असलेल्या एक लिटरच्या पाण्याच्या बाटलीसाठी स्टॉलधारक 15 रुपयेऐवजी थेट 20 रुपये आकारणी करतात. याबाबत प्रवाशांनी विचारणा केल्यास कुलिंग चार्जचे कारण सांगितले जाते. याबाबत बसस्थानकात तक्रारी करूनदेखील एसटी प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांकडून खंत व्यक्त केली जात आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes