ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 6, 2023
ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #dhyanchand
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 6 मे 2023 (चेकमेट टाईम्स): मुंबई – बंगळुरू महामार्गावरील (Mumbai – Banglore Highway) नवले पूल परिसरातील (Navale Bridge Accident) अपघात रोखण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस चौकी (Police Station) शुक्रवारी (दि. 5 मे 2023) सुरू करण्यात आली आहे. मात्र, या चौकीच्या उद्घाटनाच्या मुहूर्तापूर्वीच शुक्रवारी सकाळी दोन अपघात झाल्याने पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, नवीन कात्रज बोगदा (Katraj Bogda) ते नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून बाह्यवळण मार्गावर बोगद्याजवळ वाहतूक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीचे उदघाटन (Inauguration) पोलीस आयुक्त रितेश कुमार (Commissioner of Police Ritesh Kumar) यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आले. अपघात घडल्यास जखमींना वेळेवर मदत उपलब्ध करुन देण्यासाठी वाहतूक विभागाकडून चौकी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या चौकीचे उद्घाटन होण्यापूर्वी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत दोन अपघात झाले.
पहिल्यांदा सकाळी नऊच्या सुमारास नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ (Selfi Point, Narhe) अवजड कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटारीला धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, मोटारीचे नुकसान झाले.
तर दुसऱ्या वेळेस याच भागात सकाळी साडेअकराच्या सुमारास एक अपघात झाला. अपघातांनंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes