पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 4, 2023
पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 4 मे 2023 (चेकमेट टाईम्स): आज शिर्डी संस्थानाने (Shirdi Sansthan) केलेल्या निर्णयानुसार शिर्डीतील साईबाबांच्या (Shirdi Saibaba) आरतीसाठी आता शिफारस चालणार नाही. आता काऊंटरवरच आरती पास मिळणार असल्याचे संस्थानाने घोषित केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी फसवणूक व व्हीआयपी गर्दी आटोक्यात आणणे शक्य (No VIP entry to shirdi sai baba mandir) होणार आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो आणि उत्सव काळात लाखो साईभक्त येतात. झटपट दर्शन आणि आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत अनेकदा साईभक्तांच्या फसवणुकीचे प्रकार घडतात. बरेचदा काही सुरक्षा रक्षकांना हाताशी धरून पैसे कमवण्याचा अनेकांनी धंदा सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आरती पास घेण्यासाठी लागणारी शिफारस यामुळे भक्तांची लूट होत असल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले. या सगळ्या मुद्यांना हात घालत ग्रामस्थांनी साईसंस्थानापुढे मागण्या मांडल्या. त्यानंतर शिफारशीशिवाय काऊंटवरून आरती पास वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे आता शिर्डीतील ग्रामस्थांना केवळ आधार कार्ड दाखवून दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. ग्रामस्थांसोबत अन्य कुणालाही सोडले जाणार नाही, असेही संस्थानाने स्पष्ट केले आहे.
यासोबतच सुरक्षारक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या मार्फत कुठलाही गैरप्रकार घडू नये, यासाठी संस्थानाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात (Mobiles not allowed) आली आहे. कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. दर्शन अधिक सुकर व सोपे करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांना दर्शनासाठी वेगळे प्रवेशद्वार ठरवून देण्यात आले आहे. संस्थान व ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
साई भक्तांसोबत वाद न घालता सामंजस्याने वागण्याचे आदेश शिर्डी संस्थानाने कर्मचाऱ्यांना दिले आहे. विशेषतः सुरक्षा रक्षकांना याबाबत विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षक आणि एका भक्तामध्ये मंदिरातच फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतरच वाद न घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84