पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत?
खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:- पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत? कमेंट करा.
— Checkmate Times (@checkmate_times) May 9, 2023
लवकर मत द्या...पोल काही तासात संपेल #CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #GarbageTalk
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 10 मे 2023 (चेकमेट टाईम्स): संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Saint Shrestha Sri Dnyaneshwar Maharaj Palkhi Solah) 11 जून 2023 ला पंढरपूकडे प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी माऊलींचा रथ ओढण्याचा मान आळंदीमधील (Alandi) भोसले कुटुंबाच्या सर्जा - राजा बैलजोडीला मिळाला आहे. रथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबाने कर्नाटकमधून खिलार जातीची बैलजोडी विकत घेतल्याची माहिती संतोष तुळशीराम भोसले (Santosh Tulshiram Bhosale) यांनी दिली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्याला वारकरी (Palkhi) उपस्थित राहणार आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 11 जून 2023 रोजी पालखी सोहळा सुरू होत आहे. लाखो वारकरी (Varkari) या सोहळ्याचा याची देही याची डोळा सोहळा अनुभवत असतात. यावर्षी माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान भोसले कुटुंबाच्या सर्जा - राजा बैलजोडीला मिळाला आहे.
कर्नाटकमधील राजापूर गावातून खिलार जातीची बैलजोडी भोसले कुटुंबाने साडेतीन लाखात विकत घेतली आहे. सध्या या बैलजोडीची निगा भोसले कुटुंब राखत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या भोसले कुटुंब हे माऊलींची सेवा करत आहे. 2001, 2011 नंतर आता यावर्षी पुन्हा भोसले यांच्या बैलजोडीला हा मान तिसऱ्यांदा मिळाला आहे.
11 जून ला माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. त्याअगोदर बैलजोडीची अत्यंत काळजी घेतली जाते. पेंड, मका, गव्हाची कणिक त्यात गावरान तूप टाकून त्याचा खुराक बैलजोडीला दिला जातो. यावर्षीचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 192 वा पालखी सोहळा असणार आहे.
“सर्जा - राजा बैलजोडीची निवड करत असताना बैलजोडी ही बलवान आणि संयमी आहे का? हे पाहिलं. बैल किमान 10 किलोमीटर चालायला हवेत. ते रथ, बैलगाडी ओढू शकतात असे निकष असलेली परिपूर्ण सर्जा – राजा बैलजोडी विकत घेतली आहे” अशी माहिती संतोष भोसले यांनी दिली आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes