आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा
केला जातो?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 3, 2023
आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 3 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेद्वारा संचलित डॉ. शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना (Dr. Shamaprasad Mukherjee Health Scheme) पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. मागील वर्षभरात तब्बल 47 हजार हुन अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. परंतु निधी नसल्याचे कारण देत या अर्थसंकल्पात निधी न देता ही आरोग्यविषयक योजना बंद करून पुण्यातील नागरिकांचे आरोग्य वेठीस धरण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनामार्फत सुरु आहे. ही योजना परत सुरु करण्याची पतित पावन संघटनेची (Patit Pawan Sanghtna) मागणी आहे.
कोरोना रुपी समस्येचं वादळ आता कुठे कमी झालं असताना संपूर्ण जगाला आरोग्यविषयक यंत्रणा सक्षम करण्याचा एवढा मोठा धडा दिलेला असताना देखील पुणेकरांच्या आरोग्याशी निगडित योजनेचा प्रशासकीय बळी दिला जातो ही शरमेची बाब असल्याचे पतित पावन संघटनेने सांगितले.
स्मार्ट सिटी आणि G20 साठी सर्वसामान्य पुणेकरांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करणाऱ्या पालिकेला एक अत्यंत उपयुक्त आणि आरोग्याशी निगडित योजना निधी अभावी बंद पडताना लाज कशी वाटत नाही. या योजनेचा बळी देताना आयुक्तांना जनाची नाहीतर मनाची लाज आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली डॉ. शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना आठवड्याभरात कार्यान्वित नाही झाली तर पालिका आयुक्तांना पतित पावन पुण्यात फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशारा आज पालिका आयुक्तांना देण्यात आला.
यावेळी पतित पावन संघटना जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, कामगार महासंगाचे रवींद्र भांडवलकर, प्रसाद वाईकर, योगेश वाडेकर, यादव पुजारी, विजय क्षीरसागर, सौरभ पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -
(Patit Pawan
Association District President Dinesh Bhilare, Kamgar Mahasang's Ravindra
Kaputkar, Prasad Waikar, Yogesh Wadekar, Yadav Pujari, Vijay Kshirsagar,
Saurabh Pawar)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes