पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत?
खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:- पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत? कमेंट करा.
— Checkmate Times (@checkmate_times) May 9, 2023
लवकर मत द्या...पोल काही तासात संपेल #CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #GarbageTalk
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 10 मे 2023 (चेकमेट टाईम्स): महाविद्यालयात शिकणारे दोघे मित्र मध्यरात्रीनंतर कुतुहल म्हणून वेश्या व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या बुधवार पेठेत (Budhwar) गेले. तेव्हा तिघा चोरट्यांनी त्यांना मारहाण (Beaten Up) करुन 40 हजारांचे मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेले. (Pune Crime News)
हा प्रकार श्रीकृष्ण टॉकीजजवळील (Shreekrishna Talkies) ढमढेरे गल्लीत 3 मे 2023 रोजी पहाटे 3 वाजता घडला होता. याबाबत मांजरी (Manjari) येथील एका हॉस्टेलवर राहणाऱ्या 20 वर्षाच्या तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून मांजरीतील एका हॉस्टेलवर राहतो. मध्यरात्रीनंतर तो मित्राबरोबर कोथरुडला जेवायला जात होते. त्यावेळी वाटेत सिटी पोस्टजवळ त्यांनी मोटारसायकल पार्क केली. त्यानंतर उत्सुकतेपोटी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण टॉकीज समोरील ढमढेरे गल्लीत ते चालत गेले. त्यावेळी तिघे जण मोटारसायकलवरुन त्यांच्याजवळ आले. त्यांच्यातील एकाने कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला. तेव्हा फिर्यादी यांनी रीचार्ज संपला आहे, असे सांगितले. तेव्हा त्यांनी दोघांना मारहाण करुन त्यांच्याकडील 40 हजार रुपयांचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन ते मोटारसायकलवरुन पळून गेले. या सर्व प्रकारामुळे ते घाबरुन तेथून परत हॉस्टेलवर आले. (Pune Crime News)
त्यानंतर या प्रकाराबाबत मित्रांनी धीर दिल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे येऊन मंगळवारी (दि. 9 मे 2023) तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक अभंग (API Abhang) तपास करीत आहेत.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84