Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 13 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील युनिट-3 च्या पथकाने मित्रांमध्ये दहशत निर्माण करणार्यासाठी पिस्टल बाळगणार्याला (Pistol Seized) अटक केली आहे. (Pune Crime News)
निलेश भाऊराव काळे (25, रा. सर्व्हे नं. 53, संतोषीमातानगर, काळेपडळ, हडपसर, पुणे – Kalpadal Hadapsar) (Nilesh Bhaurao Kale) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे असा एकुण 40 हजार 800 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, गुन्हे शाखेच्या युनिट-3 मधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर आणि पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे हे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना आरोपी हा कर्वेनगर भाजी मार्केट (Bhaji Market Karve Nagar) येथील विठ्ठल मंदिरावरील कट्टयावर असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडुन 1 गावठी कट्टा (Gavti Katta) आणि 2 जिवंत काडतुसे असा एकुण 40 हजार 800 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आरोपी निलेश भाऊराव काळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूघ्द मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल आहे. मित्रांवर दहशत निर्माण करण्यासाठी आपण पिस्टल बाळगल्याचे निलेश काळेने सखोल तपासाअंती कबुल केले आहे. (Pune Crime News)
पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat), पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील (PSI Ajitkumar Patil), पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष जगताप, पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, सुरेंद्र साबळे, सुजीत पवार, संजिव कळंबे, सतिश कत्राळे, प्रताप पडवाळ, ज्ञानेश्वर चित्त, प्रकाश कट्टे, साईनाथ पाटील, गणेश शिंदे सोनम नेवसे आणि भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
हेही वाचा -
(Assistant Sub-Inspector of Police Santosh Jagtap, Police Commissioner Rajendra Marne, Sharad Vakse, Kiran Pawar, Surendra Sable, Sujit Pawar, Sanjiv Kalambe, Satish Katrale, Pratap Padwal, Dyaneshwar Chitta, Prakash Katte, Sainath Patil, Ganesh Shinde Sonam Nevse and Bhagyashree Waghmare.)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84