Type Here to Get Search Results !

PMC Job Recruitment: पुणे महापालिकेच्या 448 जागांसाठी 10 हजार 171 अर्ज

 भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

pmc job recruitment - checkmate times

पुणे, दि. 2 मे 2023 (चेकमेट टाईम्स): महापालिकेतील दुसऱ्या टप्प्यातील 448 जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या या नोकरी भरतीसाठी 10171 अर्ज आले आहेत. या नोकरभरतीसाठी (PMC Job Recruitment) अर्ज भरण्यास दोनदा मुदतवाढ दिली होती. महापालिकेतर्फे या टप्प्यात वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 मधील रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेशाने भरती केली जाणार असून, या भरतीमध्ये आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन विभागातील पदे भरण्यात येणार आहेत.

यासाठी पालिकेने ऑक्टोबर 2022 मध्ये 448 जागांसाठी पहिल्या टप्प्यात भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. आयबीपीएस या संस्थेशी करार करून ही भरतीप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली गेली. राज्य शासनाच्या आदेशानुसार नोकरभरतीसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविणारी पुणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली.

पहिल्या टप्प्यातील भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 448 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. परंतु, पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रियेसाठी कमी प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्या 18 दिवसांत केवळ 4218 अर्ज आले होते. यापैकी 3775 अर्ज पात्र ठरले.

दुसऱ्या टप्प्यातील नोकरभरतीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. 28 मार्च 2023 होती. परंतु भरतीप्रक्रियेला कमी प्रतिसाद लक्षात घेता अर्ज भरण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार 13 एप्रिल 2023 हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.

“या नोकरी भरतीसाठी आतापर्यंत 8774 अर्ज आले आहेत. त्यामुळे नोकरभरतीप्रक्रियेला पुन्हा एकदा 16 दिवसाची म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या पदासाठी एकुण 10744 अर्ज आले. त्यातील 10171 अर्ज पात्र ठरले आहेत.” अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सचिन इथापे (Sachin Ethape, Deputy Commissioner of Municipal Corporation) यांनी सांगितले.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.