Type Here to Get Search Results !

PMC Schools: महापालिका शाळांच्या शिक्षक हजेरीचा अहवाल गायब; पगार थकल्याने शिक्षक चिंताग्रस्त

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

pmc primary school teachers attendance record missing - checkmate times

पुणे, दि. 3 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे मनपा इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळांनी (PMC Primary Schools) शिक्षण मंडळाकडे शिक्षकांच्या बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल दिला. मात्र, तो गहाळ झाला आहे. यामुळे शिक्षकांचे मानधन थकले आहे. (No payment to primary school teachers)

पालिकेने 15 जून 2022 ते 22 नोव्हेंबर 2022 पर्यंत दिवाळी सुट्टी वगळून दरमहा 15 हजार रुपये मानधनावर 132 शिक्षकांच्या नियुक्‍त्या आधी सहा महिन्यांसाठी केल्या. त्यानंतर सहा दिवसांचा सेवाखंड ठेवून 29 डिसेंबर 2022 ते 6 मे 2023 या कालावधीसाठी पुन्हा नियुक्‍त्या केल्या होत्या.

शहरात महापालिकेच्या 50 इंग्रजी माध्यमाच्या प्राधमिक शाळा आहेत. यातील पाच शाळा अन्य खासगी संस्थांना चालवायला दिल्या आहेत. कंत्राटी शिक्षकांकडून 15 हजार रुपये अनामत रक्कम व 1 हजार रुपये विधी विभागाच्या काही प्रक्रियेसाठी घेण्यात आले होते. मानधन वेळेत मिळत नाही, काम जास्त व मानधन कमी, अन्य ठिकाणच्या शाळांमध्ये जास्तीचे मिळत असलेले मानधन यासह अन्य काही कारणास्तव 52 कंत्राटी शिक्षकांनी महापालिकेतील नोकरीही सोडली आहे. अखेर आता 80 शिक्षक शिल्लक राहिले आहेत.

याबाबत शिक्षक प्रतिनिधी सुनील खाडे (Teacher Representative Sunil Khade) म्हणाले कि,”महापलिकेने कंत्राटी शिक्षकांचे थकीत मानधन लवकर देण्याची गरज आहे. महापालिकेने तुटपूंज्या मानधनावर शिक्षकांच्या हंगामी नियुक्‍त्या करण्याऐवजी कायमस्वरुपी पूर्ण वेळ शिक्षकांची भरती करावी. समान काम समान वेतन मिळायला हवे आहे. अनामत रक्कमही तत्काळ मिळावी, अशी मागणी पालिकेकडे केली आहे.”

हेही वाचा -

तर “बायोमेट्रिक हजेरी अहवाल मिळत नसल्यामुळे 25 शिक्षकांचे जानेवारीचे मानधन रखडले आहे. शाळांकडून पुन्हा शिक्षकांची हजेरी मागवून घेण्यात आली आहे. थकीत मानधन अदा करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. 80 शिक्षकांचे एप्रिलचे मानधनही आठवडाभरात देऊ. शिक्षकांच्या सेवा समाप्तीनंतर महिनाभरात त्यांना अनामत रक्कम परत करण्यात येणार आहे.” असे मनपा शिक्षण मंडळाचे अधीक्षक दत्तात्रय फुले (Municipal Board of Education Superintendent Dattatraya Phule) म्हणाले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.