Type Here to Get Search Results !

DRDO शास्त्रज्ञ कार्यालय संचालक प्रदीप कुरुलकर’ने पुरवली पाकिस्तानला गोपनीय माहिती?; ATS कडून अटक

पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 5 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या (Pakistani intelligence agency) हस्तकाशी संपर्क साधून देशासंदर्भातील संवेदनशील माहिती आणि गुपिते पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी पुणे दहशतवादविरोधी पथकाने (Anti Terrorism Squad - ATS) डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (Defense Research and Development Organization - DRDO) संचालक प्रदीप कुरूलकर (Pradeep Kurulkar) यांना अटक केली. याबाबत एटीएसने माहिती दिली. (Pradeep Kurulkar Accused of providing sensitive information about the country to Pakistan)

मिळालेल्या माहितीनुसार, 3 मे 2023 रोजी पुणे येथील डी.आर.डी.ओ.च्या शास्त्रज्ञ कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्यावर असताना, कुरूलकर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह हस्तकाच्या संपर्कात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप व्हॉइस मेसेज, व्हिडीओ कॉलद्वारे तो पाकिस्तानी हस्तकाच्या संपर्कात होता. त्यांच्या निवृत्तीला सहा महिने राहिले होते. गेल्या सहा महिन्यांपासून मोबाइलच्या माध्यमातून तो पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेसोबत संवाद साधत असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.

कुरूलकरने पदाचा गैरवापर करून त्याच्या ताब्यात असलेली देशासंदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली आणि तो हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकल्याने त्याने संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय एटीएसला आला आणि एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

त्याच्यावर मुंबई येथील काळा चौकी पोलीस ठाण्यात (Kala Chowk Police Station, Mumbai) गुन्हा दाखल केला आहे. शास्त्रज्ञाने नेमकी कोणती गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली याचा तपास एटीएसकडून सध्या सुरू आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.