पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे
का? काय उपाय करायला हवेत?
खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:- पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत? कमेंट करा.
— Checkmate Times (@checkmate_times) May 9, 2023
लवकर मत द्या...पोल काही तासात संपेल #CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #GarbageTalk
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 9 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी (Police blockade) करत असताना दक्ष वाहतुक पोलिसांच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी 3 कोटी 42 लाख रु नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रीझा कारमधून पकडल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी 7 वाजेपर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरु होते. गुन्हे शाखा, हडपसर पोलीस तसेच वाहतुक पोलिसांच्या मदतीने ही कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली. याबरोबर नोटा मोजण्याची मशीनही पोलिसांनी जप्त केली. यावेळी प्रशांत धनपाल गांधी (वय 47, रा. लासुर्णे. ता. इंदापूर जि. पुणे) (Prashant Dhanpal Gandhi) यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.
हा पहा व्हिडीओ -
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, शहरात वाहतुक पोलीस तसेच स्थानिक पोलिसांच्यावतीने नाकाबंदी करण्यात येत आहे. सोमवारी (दि. 8 मे 2023) रात्री दहाच्या सुमारास वाहतुक विभागातील कर्मचारी शेवाळवाडी परिसराजवळ असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ संशयीत वाहनांची तपासणी करत असताना त्याला एक व्यक्ती आणि एक महिला संशयास्पदरित्या ब्रीझा कारमधून येताना दिसले. त्याने लागलीच कार थांबवून गाडीची तपासणी केली असता त्याला गाडीच्या मागील डिक्कीत संशायास्पदरित्या बॅगा दिसून आल्या.
त्याने बॅगेच्या चैनी उघडून पाहिल्या असता बॅगेत मोठया प्रमाणावर नोटांचे बंडल असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवल्यानंतर गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांसह हडपसर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ब्रीझा कार हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
घटनेचे गांभीर्य पाहता गुन्हे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (Deputy Commissioner of Crime Police Amol Zende, Assistant Commissioner of Police Narayan Shirgaonkar) हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी स्वत: गांधी याच्याकडे विचारपूस केल्यानंतर गांधीकडून ही व्यावसायीक रक्कम असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान नोटांच्या बॅगा असलेल्या गाडीला एका पिस्तुलधारी पोलिसाची सुरक्षा लावण्यात आली.
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पंचनामा करण्यासाठी रोकड असलेल्या विमल गुटखा नाव असलेल्या चार बँगा व त्याबरोबर छोट्या मोठ्या बॅगा गाडीतून बाहेर काढण्यात आल्या. यावेळी नोटांच्या काही छोट्या बॅगा ब्रीझा कारच्या मधल्यासीट खाली देखील लपवून ठेवण्यात आल्या होत्या. त्या बॅगा गांधी याने पोलिसासमक्ष काढून दिल्या. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी बॅगा रोकड मोजण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आत नेण्यात आल्या.
सकाळी 7 वाजेपर्यंत पोलिसांकडून नोटा मोजण्याचे काम सुरू होते. त्या बँगेत एकूण 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये मिळून आले. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का, का ह्या नोटा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविल्या जात होत्या का त्या अनुषंगाने पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीवरून 8 मे 2023 रोजी संध्याकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखा, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा युनिट 5 यांनी संशयित ब्रिजा कार ताब्यात घेऊन सदरचे वाहन आणि संशयित व्यक्तीस हडपसर पोलीस स्टेशनला आणले. या व्यक्तीकडे कसून चौकशी केली असता सदरची रक्कम त्याच्या राहत्या घरातून पुणे येथील महाराष्ट्र बँक मुख्य शाखा, लक्ष्मीरोड येथे कर्जापोटी भरायची होती असे सांगत आहे.
याबाबत सी आर पी सी कलम 41(D) अन्वये हडपसर पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली असून आयकर विभाग पुणे यांना पुढील कारवाई करणेबाबत कळविण्यात आले आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84