Type Here to Get Search Results !

Satara Road Explosion: सातारा रस्त्यावरील त्या आगीच्या घटनेमागे संशयाची सुई; तो स्फोट नक्की कशाचा?

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

pune satara road huge explosion - checkmate times

पुणे, दि. 3 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे-सातारा रस्त्यावरील एका दुकानात भीषण स्फोट (Massive explosion in a shop on Pune-Satara road) झाला. यामुळे लगतच्या तीन दुकानांच्या भिंती पूर्णपणे कोसळल्या, पिलरचे नुकसान झाले, तर दुकानाचे शटर तब्बल 50 फुट दूर उडाले. यामुळे दोन सोसायट्यांतील सदनिकांचे नुकसान होऊन रस्त्यावर काचांचा खच साचला होता. या स्फोटाची तीव्रता एखाद्या आरडीएक्‍स बॉम्बस्फोटाइतकी भयंकर होती.

घटनेची तीव्रता समजताच दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्‍वान पथक, फॉरेन्सिक पथक, गुन्हे शाखेची पथके, अग्निशमन दल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले होते. ही भीषण घटना सोमवारी (दि. 1 मे 2023) मध्यरात्री घडली. यामध्ये दुकानाचा मालक समीर कोलते (48, रा. पर्वती) (Sameer Kolte) गंभीर जखमी झाला, तर रस्त्याने जाणारा एक हॉटेलमालकही जखमी झाला आहे. तपास यंत्रणांनी घटनास्थळाचे नमुने गोळा करुन नेले. या स्फोटाबद्दल तपास यंत्रणांनी शंका व्यक्त केल्याने गांभीर्य वाढले आहे.( Anti-Terrorism Squad (ATS), Bomb Detection and Disposal Squad (BDDS), Dog Squad, Forensic Squad, Crime Squad, Fire Brigade and Senior Police Officers)

पुणे-सातारा रस्त्यावर डी-मार्टशेजारी “इंद्रनील’ सोसायटी (Indraneel Society) आहे. तेथे देवयानी इलेक्‍ट्रॉनिक्‍स हे (Devyani Electronics) तीन गाळ्यांचे शोरुम आहे. त्याशेजारी शेगडीचे आणि मोबाइलचे दुकान आहे. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास देवयानी इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये मोठा स्फोट झाला. यामुळे शोरुमचे पाचही शटर उखडून रस्त्यावर फेकले गेले. एक शटर रस्त्यापलीकडे पडले. याच बरोबर स्फोटात दुकानमालक 15 फुट लांब उडून जखमी अवस्थेत पदपथावर पडला. विटा, कॉलम आणि दुकानातील साहित्य रस्त्यापलीकडे उडाले.

शोरुम आणि शेजारील दोन्ही दुकानांच्या भिंती पूर्णपणे पडल्या. तसेच पिलरही वाकले. या स्फोटामुळे शोरुमवरील दोन्ही मजल्यावरील आठ खासगी कार्यालयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या खिडक्‍यांच्या काचा आणि फर्निचर अस्ताव्यस्त पडले.

शेजारील कमल हेरिटेज सोसाटीच्या (Kamal Heritage Society) सदनिकांच्या खिडक्‍यांच्या काचा फुटल्या. यामध्ये गाढ झोपेत असलेले काही रहिवाशी जखमी झाले. स्फोटाच्या हादऱ्याने दोन्ही सोसायट्यांमधील 70 सदनिकांतील रहिवासी घाबरुन बाहेर पडले. घटनास्थळी अग्निशमन दलाची सहा वाहने, दोन वॉटर टॅंकर आणि एक रुग्णवाहिका दाखल झाली होती.

पोलीस आणि अग्निशमन दलाने रात्रभर रस्त्यावरील आणि बीआरटी मार्गावरील काचा, विटा आणि इतर साहित्य स्वच्छ करुन रस्ता वाहतुकीस खुला केला. यामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. हा स्फोट दिवसा झाला असता, तर मनुष्यहानीही मोठी झाली असती. सुदैवाने घटनेवेळी जवळपास कोणी नागरिक नव्हते.

हे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचे दुकान असल्याने फ्रीज आणि एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला असावा, अशी शक्‍यता प्रथम वर्तवली गेली. मात्र, स्फोटाची भीषणता आणि घटनास्थळाचे दृश्‍य बघता सर्वच तपास यंत्रणांनी शॉर्टसर्किट, सिलिंडर स्फोट किंवा क्रॉम्पेसरच्या स्फोटाने इतके नुकसान कधीच होत नसल्याबाबत एकवाक्‍यता दर्शवली. हा स्फोटाचा प्रकार संशयास्पद असल्याचा अंदाज यंत्रणांनी वर्तवला. यामुळे घटनास्थळी ‘एटीएस’सह इतर महत्त्वाच्या तपास यंत्रणा दाखल झाल्या. तर घटनास्थळी स्फोटामुळे इमारतीच्या पिलर्सचे मोठे नुकसान झाले आहे.

यामुळे अग्निशमन दलाचे त्याचे स्ट्रक्‍चलर ऑडिट करण्याची सूचना सोयायटीला दिली आहे. तर, सोमवारी दिवसभर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. समीर कोलते यांनी येथील शोरुम आणि मोबाइलचे दुकान भाडे तत्वावर चालवायला घेतले आहे. या घटनेत ते स्वत: 40 टक्के भाजले आहेत. ते भाड्याचे दुकान काही दिवसांत सोडणार होते. यामुळे मालाची आवराआवर करत असल्याचा जबाब दिला आहे. तपास यंत्रणांनी घटनास्थळावरुन काही नमुने गोळा केले आहेत. याचा अहवाल अद्याप आला नाही.

स्फोटाची तीव्रता इतकी कशामुळे?, दुकानमालक इतक्‍या रात्री दुकानात काय करत होता?, स्फोट होण्याचे नेमके कारण काय? तसेच शॉर्टसर्किट किंवा कॉम्प्रेसरचा स्फोट असल्यास त्याची तीव्रता इतकी असू शकते का? असे काही प्रश्न यंत्रणेला पडले आहेत.

सागर सणस जखमी झाल्यावर त्यांच्याकडे पाहण्याऐवजी, त्यांना प्रथमोपचार करण्याऐवजी, किंवा दवाखन्यात पोहोचवण्याऐवजी तेथील बघ्यांनी मोबाइलमध्ये शूटिंग करायला सुरूवात केली. त्यांच्यामागूनच एक वाहनचालक होते. ते पुढे गेले, मात्र त्यांच्या सद्‌सदविवेक बुद्धीला तसेच पुढे जाणे पटले नाही आणि ते पुन्हा मागे आले आणि त्यांनी सणस यांची मदत केली.

डोक्‍याला मार लागल्याने त्यातून रक्त येत होते, अंगातील शर्ट काढून तो डोक्‍याला बांधला, आणि सणस यांच्या मोबाइलवरून कॉल करून त्यांच्या कुटुंबीयांना ही माहिती दिली. ते रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले असताना, तेथे उपस्थितांनी मदतीऐवजी घटनेचे शूटिंग करायला सुरूवात केली. मात्र जखमी अवस्थेत पडलेल्या वाहनचालकाला काही मदत करावी एवढी माणुसकीही तेथील बघ्यांनी दाखवली नाही.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.