पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 4, 2023
पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 4 मे 2023 (चेकमेट टाईम्स): गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell) पुणे स्टेशन परिसरातील एका तारांकित हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा प्रकार (Prostitution) उघडकीस आणला. या कारवाईत दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील चार तरुणींना ताब्यात घेण्यात (Delhi, Uttar Pradesh, West Bangal) आले आणि दलालांना अटक करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने तरुणींना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. (Pune Crime News)
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दलाल समाजमाध्यमातून ग्राहकांच्या संपर्कात होते. पुणे स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमधील खोली घेऊन दलाल परराज्यातील तरुणींना तेथे बोलावून घ्यायचे. ग्राहकांशी ऑनलाइन पद्धतीने सर्व व्यवहार करत होते. ऑनलाइन वेश्या व्यवसायाची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी तुषार भिवरकर आणि अमित जमदाडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकांच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधला आणि सापळा लावला.
पुणे स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये दलालांनी दोन खोल्या आरक्षित करुन ठेवल्या होत्या. या ठिकाणी दोन तरुणींना बोलविण्यात आले. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा येरवडा भागात आणखी दोन तरुणी आणि तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली. येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातून तीन दलाल तसेच दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलीस हवालदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनीषा पुकाळे, अमित जमदाडे, इरफान पठाण, इम्रान नदाफ आदींनी ही कारवाई केली.
हेही वाचा -
(Additional Commissioner of Police Ram Nath Pokle, Deputy Commissioner Amol Zende, Senior Police Inspector of Social Security Department Bharat Jadhav, Assistant Inspector Ashwini Patil, Aniket Pote, Police Constables Rajendra Kumawat, Baba Karpe, Ajay Rane, Tushar Bhivarkar, Manisha Pukale, Amit Jamdade, Irfan Pathan, Imran Nadaf)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84