Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 12 मे 2023 (चेकमेट टाईम्स): मालासह निघालेल्या ट्रक चालकाचे जबरदस्तीने अपहरण करून वाहनातून 35 लाखांचे लोखंडी रॉड दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली. बारामती न्यायालयाने या प्रकरणातील सहा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Pune Crime News)
या प्रकरणी मारुती मोतीलाल करांडे (रा. आसंगी, ता. जत, जि. सांगली) (Maruti Motilal Karande) यांनी फिर्याद दिली होती. दिग्विजय श्रीकांत जाधव (वय 21), लक्ष्मण भीमराव कुचेकर (वय 30), सुहास रावसाहेब थोरात (वय 28, तिघे रा. उदमाईवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), प्रथमेश मनोज शेलार (वय 23, रा. घोलपवाडी, ता. इंदापूर), मयुर प्रकाश शिंदे (वय 28, रा. तावशी, ता. इंदापूर) व स्वप्निल दत्तात्रय निंबाळकर (वय 28, रा. 39 फाटा, सणसर, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 9 मे 2023) घडली. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, करांडे त्यांच्या ट्रक (एनएल-01, एबी-3577) मधून बारामती एमआयडीसीतील माऊली कृपा ट्रान्सपोर्टमार्फत (Maulikrupa Transport) कर्नाटक (Karnatak) येथून लोखंडी रॉड भरून पुण्यात मुंढवा (Mundhva) येथील भारत फोर्जमध्ये घेवून जाण्यासाठी निघाले होते. भिगवणजवळ ते गाडीतच झोपले असताना तिघांनी त्यांच्याकडून चार हजार रुपये व मोबाईल चोरला. ट्रेलर चालू करून तो बारामतीच्या दिशेने आणला. (Pune Crime News)
भिगवणमध्ये (Bhigwan) त्यांना आणखी तीन साथीदार मिळाले. त्यांनी या ट्रकमधून 35 लाखांचे लोखंडी रॉड चोरले. तसेच 19 लाख रुपये किंमत असलेले वाहनही त्यांनी नेले. करांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात दरोड्याचा व जबरी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
बारामती नजिक कन्हेरीच्या (Kanheri, Baramati) हद्दीत पालखी महामार्गालगत त्यांनी हे वाहन आणले. तेथून दुसऱ्या वाहनात हे रॉड टाकून ते दुसरीकडे नेत विकण्याचा त्यांचा हेतू होता. करांडे यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत बारामती तालुका पोलीस ठाणे (Baramati Police Station) गाठले. (Pune Crime News)
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पथके रवाना केली. दरम्यान, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम सुरु असतानाच ट्रेलरसह दोन दरोडेखोरांना जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडून इतर साथीदारांची माहिती घेत आजूबाजूच्या झाडाझुडपात लपून बसलेल्या अन्य चार जणांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा -
(Digvijay Srikant Jadhav, Laxman Bhimrao Kuchekar, Suhas Raosaheb Thorat, Prathamesh Manoj Shelar, Mayur Prakash Shinde and Swapnil Dattatraya Nimbalkar.)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84