Type Here to Get Search Results !

Sachin Dodke Birthday: उद्यापासून 21 मे पर्यंत वारजेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; सचिन दोडके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

sachin dodke birthday events organised at warje - checkmate times

पुणे, दि. 4 मे 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे सांस्कृतिक मंचच्या (Warje Sanskrutik Manch) माध्यमातून नगरसेवक सचिन दोडके यांच्या वाढदिवसानिमित्त (on occasion of Sachin Dodke Birthday) यंदा देखील “वारजे कला महोत्सव” (Warje Kala Mahotsav) आयोजित करण्यात आला असून, उद्या शुक्रवार दि. 5 मे 2023 पासून रविवार 21 मे 2023 पर्यंत तब्बल दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ वारजेकरांना भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी (Feast of Cultural Events) उपलब्ध होणार आहे.

ज्या पद्धतीने वारजे परिसरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ (Platform for Players) मिळवून देण्यासाठी सचिन दोडके स्पोर्ट्स क्लबच्या (Sachin Dodke Sports Club) माध्यमातून “वारजे ऑलिम्पिक” क्रीडा स्पर्धा (Warje Olympics sports competition) सुरु करण्यात आल्या आहेत. त्याच पद्धतीने वारजे परिसरातील कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ (Platform for Artists) मिळवून देण्यासाठी नगरसेवक सचिन दोडके यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या वारजे सांस्कृतिक मंचच्या या वारजे कला महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे “वारजे बदलतंय” या उक्तीला सार्थ करण्यासाठी सचिन दोडके यांच्या माध्यमातून कार्यक्रम, उपक्रमांमध्ये सातत्य असल्याचे स्पष्ट होते आहे.

यावर्षी देखील आरएमडी कॉलेज (RMD College Warje) समोरील मैदानावर भरवण्यात येणार असलेल्या वारजे सांस्कृतिक मंचच्या या वारजे कला महोत्सवामध्ये उद्या शुक्रवार दि. 5 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता “श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे” हे ह.भ.प. कल्पक पिंगळे (Kalpak Pingale) यांचे नारदीय कीर्तन (Naradiya Kirtan) होणार आहे. तर शनिवार दि. 6 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता “जगदीश खेबुडकर” (Jagdish Khebudkar) यांच्या जयंती निमित्त अंगाई खेबुडकर महाजनी प्रस्तुत (Angai Khebudkar Mahajani Presents), शब्दप्रभू गीतकार जगदीश खेबुडकर स्मृती संध्या (Jagdish Khebudkar Memorial Evening), “चंद्र आहे साक्षीला” (Chandra Ahe Sakshila) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे निवेदन कविता खेबुडकर (Kavita Khebudkar) या करणार असून, ओंकार पाटणकर (Omkar Patankar), नरेंद्र चिपळूणकर (Narendra Chiplunkar), ऋतुराज कोरे (Ruturaj Kore) आणि नितीन शिंदे (Nitin Shinde) या वादकांच्या सुरेल वादनामध्ये सई हातेकर (Sai Hatekar), गिरीश पंचवाडकर (Girish Panchwadkar), सुदेंद्र अंतरकर (Sudendra Antarkar), गोपाळ शिंदे (Gopal Shinde), गजेंद्र सुतार (Gajendra Sutar), सोनिया भालपांडे (Sonia Bhalpande) हे कलाकार वारजेकरांची सायंकाळ सुरेल (Pleasant Evening) करणार आहेत.

रविवार दि. 7 मे 2023 रोजी नगरसेवक सचिन दोडके यांचा वाढदिवस (Birthday Celebration of Sachin Dodke) असून, या दिवशी तर वारजे माळवाडीचा जसा काही उरूसच अर्थात यात्रेसारखे स्वरूप वारजे माळवाडी परिसराला येत असते. सकाळपासूनच लहान मुलांसाठी अंडी वाटप, शालेय वस्तूंचे वाटप, आंबे खाण्याची स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांसह सायंकाळी चौका-चौकात सचिन दोडके यांच्या वाढदिवसाचे केक कापले जात असतात. लहान मुलांसाठी बालजत्रेचे आयोजन (Children's Fair) करण्यात आलेले असते. यामध्ये मुलांना पाणीपुरी, भेळ पासून पिझ्झा पर्यंत खाऊ देण्यात येतोच, शिवाय मनमुराद खेळणी, जम्पिंग जॅक, घसरगुंडी, निरनिराळी खेळणी, बग्गी, घोडागाडीच्या चक्कर मारण्याचा आनंद मुले लुटत असतात. त्यामुळे एकप्रकारे शाळेला लागलेल्या सुट्ट्यांचा खरा आनंद “सचिन मामा”च्या वाढदिवसाच्या औचित्याने मुले लुटत असल्याचे वारजे माळवाडीकर आवर्जून सांगतात.

यानंतर सोमवार दि. 8 मे 2023 पासून गुरुवार दि. 11 मे 2023 पर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजता, प्रसिद्ध शिवशंभूचरित्र व्याख्याते ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे (Dharmaraj Hande Maharaj) यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील शिवशंभूचरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हांडे महाराजांच्या तोंडून जेव्हा आपण या रयतेच्या राजांचे वर्णन ऐकू तेव्हा अंगावर रोमांच उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असे रोमांचकारी सादरीकरण हांडे महाराज करतात. त्यांचे हे कार्यक्रम अनेक प्रसिद्ध चॅनल्सवर झालेले असून, ते देखील एक वारजेकर आहेत.
शुक्रवार दि. 12 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता “अजरामर गीते” हा वारजे मधील ज्येष्ठ नागरीकांच्याद्वारे हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील सुप्त कलाकारांना बाहेर काढून, व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न सचिन दोडके यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तर शनिवार दि. 13 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता “कल... आज और कल...” या जुन्या नवीन हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचा सुरेल नजराणा वारजेकरांना मिळणार आहे.

रविवार दि. 14 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता स्वरदा कुलकर्णी, हरिद्रा महाजनी, मधुरा देशपांडे, मेघा आणि मेधा नागराड यांच्यासह सहकाऱ्यांचा “भक्तीनृत्यसुधा” हा भक्ती संगीतावरील शास्त्रीय नृत्याचा अविष्कार वारजेकरांना ‘याची देही, याची डोळा’ अनुभवता येणार आहे. तर गुरुवार दि. 18 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता जगप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. 19 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता महेश जेस्ते यांचा वेणुनाद प्रस्तुत “रंग रागांचे” हा ‘क्लासिकल फ्युजन म्युजिक कॉन्सर्ट’ अनुभवायला मिळणार आहे. बासरी, तबला यांच्या सोलो वादनासह, वाद्यांच्या जुगलबंदीचे होणारे सादरीकरण सर्वांसमोर एक प्रसन्न सायंकाळ सादर करेल यात शंका नाही. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी शनिवार दि. 20 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्राच्या महान लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा लोककला अविष्कार “महाराष्ट्राची लोकधारा” वारजेकरांना अनुभवायला मिळणार असून, रविवार दि. 21 मे 2023 रोजी सायंकाळी सर्व वारजेकरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.