ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 6, 2023
ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #dhyanchand
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 6 मे 2023 (चेकमेट टाईम्स): नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्वच शाळांमध्ये एकच गणवेश (Same Uniform) दिसणार आहे. त्यासाठी सरकारमार्फत कापड दिले जाणार असून, त्याची शिलाई मात्र बचत गट किंवा स्थानिक पातळीवर केली जाणार आहे. तसा प्रस्तावच शासनाला देण्यात आला असून, त्याची यंदापासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी (Education Department) दिली आहे.
सध्या शाळा त्यांच्या पातळीवर गणवेश कसा असावा हे ठरवतात. अनेक शाळांतील विद्यार्थीच गणवेशाचा रंग ठरवतात. शासन पैसे वाटप करते आणि शाळा व्यवस्थापन समित्या, संस्था यांच्या स्तरावर कापड खरेदी करून विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातात. काही वर्षांपूर्वी राज्याच्या स्तरावर गणवेश खरेदीचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, त्यातील गोंधळामुळे तो बदलून खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला (School Management Committee) देण्यात आले होते. काही अधिकार्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी शासनाच्या लक्षात आणून दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना दिला जाणारा मोफत गणवेश सध्या शाळा व्यवस्थापन समित्या, संस्थास्तरावर दिला जात आहे. आता मात्र राज्यस्तरावरून गणवेशाचे कापड खरेदी करण्यात येणार असल्यामुळे राज्यातील सर्व शासकीय शाळांचा गणवेश एकाच स्वरूपाचा दिसणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांतील राखीव प्रवर्गातील (Free uniforms to Reserved Category) विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थिनींना मोफत गणवेश देण्यात येतो. यंदापासून खुल्या गटातील (Open Category) विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्यात येणार आहे.
“विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचे गणवेश मिळावेत, यासाठी एमपीएसपीमार्फत शासनाला एक प्रस्ताव देण्यात आला आहे. यामध्ये एकाच रंगाचे कापड शासनाकडून देण्यात येईल, तर गणवेशाची शिलाई बचत गट, तसेच स्थानिक पातळीवर करून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. परंतु हा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नाही. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.” असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी (Sharad Gosavi, Director, Directorate of Primary Education) म्हणाले.
हेही वाचा -
दर वर्षी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशाचा निधी मिळतो. तो शाळांकडे विद्यार्थीसंख्येनुसार वर्ग केला जातो आणि शाळा व्यवस्थापन समित्या कापड खरेदी, गणवेश शिवून घेणे ही प्रक्रिया सुरू करतात. मात्र, यंदा हा निधी शाळांपर्यंत पोहोचलेला नाही. राज्याच्या स्तरावर कापड खरेदी करायचे झाल्यास कापड खरेदीची निविदा, त्यानंतर बचत गट किंवा स्थानिक पातळीवर गणवेश शिवणे आणि विद्यार्थ्यांना देणे, अशी सर्व प्रक्रिया अवघ्या दीड महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे. कारण 15 जून 2023 ला शाळा सुरू होणार आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84