पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत?
खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:- पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत? कमेंट करा.
— Checkmate Times (@checkmate_times) May 9, 2023
लवकर मत द्या...पोल काही तासात संपेल #CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #GarbageTalk
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 11 मे 2023 (चेकमेट टाईम्स): रविवारी (दि. 7 मे 2023) देशभरात नीट परीक्षा (NEET Exam) पार पडली. पण सांगलीमध्ये (Sangli) झालेल्या नीट परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थिनींशी गैरवर्तन करण्याचा लाजिरवाणा आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींनाच अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले.
सांगली शहरातल्या कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात (Kasturba Valchand College) परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला. या घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थिनीच्या पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, परीक्षेसाठी येणा-या विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करायला लावण्याच्या सूचना (Instructions to examine the female students and make them wear clothes inside out) देण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थिनींना आणि सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आपले कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालून परीक्षा द्यावी लागली. परीक्षा झाल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरचे उलटे कपडे पाहून पालकही बुचकळ्यात पडले. पालकांना याबाबत विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (National Testing Agency) तक्रार दाखल केली.
सांगलीतील या धक्कादायक प्रकरणानंतर ज्या ठिकाणी परीक्षा पार पडल्या त्या कॉलेज प्रशासनाकडून त्यांचा या परीक्षेशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. केवळ परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रशासनाने हात वर केल्यामुळे घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84