ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 6, 2023
ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #dhyanchand
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 6 मे 2023 (चेकमेट टाईम्स): वेळू (ता. भोर) येथील वृंदावन गार्डन येथे (Vrindavan Garden, Velu, Bhor) लोकार्पण सोहळा व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Krishi Utpanna Bajar Samiti) संचालक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी “शेतकर्यांनी आमची कामे पाहूनच भरघोस मतांनी विजयी केले, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मात्र, यादरम्यान विरोधकांनी माझ्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, शिक्षणाबद्दल बोलून आपले अज्ञान दाखवून दिले आहे. अगदी खालच्या पातळीवर जाऊन बोलणे हे खेदजनक आहे. परंतु, मी अजूनही संयम पाळला आहे. पण, जर का माझा संयम सुटला, तर तुम्ही इथे कुठेही दिसणार नाहीत, कातालाही दिसणार नाही, याची जाणीव त्यांनी ठेवावी.” असे विधान भोरचे आमदार संग्राम थोपटे (Bhor MLA Sangram Thopate) यांनी केले.
“पूर्वी तांदूळ बाजार आपल्याकडे भरत होता. मात्र, काहींनी त्यामध्ये चुका केल्याने तो बंद झाला. मात्र, आता बाजार समितीमार्फत शेतकर्यांकडून तांदूळ खरेदी करून त्यांना एक चांगला हमीभाव देण्याचा मनोदय आहे. या वेळी गावामध्ये ज्या समस्या आहेत त्याची कामे मार्गी लागतील.” असेही थोपटे यांनी सांगितले.
“शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणार्यांसोबत ज्यांनी निवडणूक लढविली त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे भविष्यात तरी ते आमच्या नादी लागणार नाहीत. तुम्ही जनतेची कामे केली, तर जनता तुम्हाला डोक्यावर घेते, हे 18/0 या निकालातून दिसून आले आहे. जनतेला गृहीत धरले तर पानिपत होते.” असा सल्लाही नवनिर्वाचित संचालकांना त्यांनी दिला.
हेही वाचा -
याप्रसंगी पोपट सुके, शैलेश सोनवणे, दिनकर धरपाळे, शिवनाना कोंडे, विठ्ठल आवाळे, सरपंच ईश्वर पांगारे, उपसरपंच सुजाता खुंटे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगारे, अमोल पांगारे, आप्पा धनावडे, तसेच जीवन धनावडे, मंगेश सुर्वे, ग्रामसेवक उल्हास कोरडे आदी या वेळी उपस्थित होते.
(Popat Suke, Shailesh Sonawane, Dinkar Dharpale, Shivnana Konde, Vitthal Awale, Sarpanch Ishwar Pangare, Sub-Sarpanch Sujata Khunte, Former Sarpanch Dnyaneshwar Pangare, Amol Pangare, Appa Dhanawade, Jeevan Dhanawde, Mangesh Surve, Village Sevak Ulhas Korde)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84