Type Here to Get Search Results !

Pune Crime: बंगल्याच्या नेपाळी सुरक्षा रक्षकानेच केली बंगल्यात लाखोंची चोरी; बांधकाम व्यावसायिकाची पोलिसात तक्रार

मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

    

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

security guard stole lakhs from builder house - checkmate times

पुणे, दि. 8 मे 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील एका बिल्डरच्या बंगल्यातून सुरक्षा रक्षकानेच 79 लाख रूपयांचा मौल्यवान ऐवज चोरी (Theft) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सेनापती बापट रस्त्यावरील मंगलवाडी सोसायटीमध्ये (Mangalwadi Society, Senapati Bapat Road) शनिवारी रात्री घडली. (Pune Crime News)

प्रीतम राजेंद्र मंडलेचा (वय 35, रा. राजव्हिला बंगलो, सेनापती बापट रस्ता) (Pritam Rajendra Mandalecha) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरक्षा रक्षक झंकार बहादूर सौद (मूळ रा. नेपाळ) (Security guard Zhankar Bahadur Saud) आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चतुःश्रृंगी पोलिसांनी (Chaturshrungi Police) माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डर मंडलेचा हे शनिवारी रात्री आठ ते 10 वाजण्याच्या दरम्यान कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधत सुरक्षा रक्षक झंकार सौद आणि त्याच्या दोन साथीदारांनी मंडलेचा यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे लॅच तोडून आत प्रवेश केला. (Pune Crime News)

चोरट्यांनी बंगल्यातून 10 लाख 50 हजारांची रोकड, 10 लाखांची सोन्याची बिस्किटे, 24 लाखांचे दोन कुंदनहार, पाच सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळ्या, सोन्याचे कडे, ब्रेसलेट, सोन्याच्या बांगड्या, डायमंड मंगळसूत्र, निळा पाचू, नेकलेस (Jewellary Stolen) असा एकूण 78 लाख 93 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.

“आरोपी झंकार सौद हा दोन महिन्यांपूर्वी एजन्सीमार्फत बिल्डर मंडलेचा यांच्या बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कामास लागला होता. तो बंगल्याच्या आवारातच राहत होता. त्याने आपण मोबाईल वापरत नसल्याचे त्यांना सांगितले होते. दरम्यान, पोलिसांचे एक पथक नेपाळ बॉर्डरकडे पाठविण्यात आले आहे.” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Senior Police Inspector Balaji Pandey) यांनी सांगितले. (Pune Crime News)

या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपेश चाळके करीत आहेत.

हेही वाचा - 

(Deputy Commissioner of Police Shashikant Borate, Assistant Commissioner Arti Bansode, Assistant Commissioner of Crime Branch Sunil Pawar, Senior Police Inspector Balaji Pande, PI Ankush Chintaman, PSI Rupesh Chalke)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.