Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 11 मे 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे पोलीस स्टेशनच्या (Warje Police Station) धाडसी बीट मार्शल्समुळे (Beat Marshalls) कोयते बाळगलेल्या 5 जणांसह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेण्यात यश आले आहे. त्यामुळे वारजे पोलीस स्टेशन हद्दीत होऊ घातलेल्या अनुचित प्रकाराला थोपवण्यात वारजे पोलिसांना यश आले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह-आयुक्तांच्या आदेशावरून (Joint Commissioner of Law and Order) पुणे शहरात मंगळवार दि. 2 मे 2023 पासून सोमवार दि.15 मे 2023 पर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेश लागू (Prohibition Orders) करण्यात आलेले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन हद्दींमध्ये गस्त (Police Patroling) वाढवण्यात आलेली असून, कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
दरम्यान वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके (Senior PI Dagadu Hake), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे (Crime PI Dattaram Bagawe) यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि.10 मे 2023 पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कर्वेनगर बीट मार्शल (Karvenagar Beat Marshall) सागर कुंभार (Sagar Kumbhar), हेमंत पवार (Hemant Pawar) गस्त घालत असताना, कर्वेनगर उड्डाणपुलाखालून (Karve Nagar Fly Over) दोन दुचाकींवरून सहा जण जात असल्याचे मार्शल्सच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, संबंधित दुचाकीवरील तरुणांचा मार्शल्सने पाठलाग केला. यावेळी तरुणांनी पोलीस मागे लागल्याचे पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्शल्स सागर कुंभार, हेमंत पवार यांनी कसलीही पर्वा न करता त्यांचा पाठलाग करत दोघांना पकडले. यावेळी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे 500 रुपये किमतीचे 2 कोयते मिळून आले.
दोघांनाही वारजे पोलीस स्टेशनला आणून, त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांच्या पळून गेलेल्या साथीदारांची नावे निष्पन्न झाली. यावेळी वारजे पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत वारजे माळवाडी मधील म्हाडा कॉलनी मध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीनासह, चिराग मुकेश निहलानी (वय 19), अल्ताफ अब्दुल शेख (वय 20), प्रमोद बोंदर (वय 21, सर्वजण रा. न्यू म्हाडा कॉलनी, हडपसर, पुणे), शुभम भारत हेडंबे (वय 22, रा. अप्पर डेपो, बिबवेवाडी, पुणे) आणि दिलीप बालाजी गुरणे (वय. 18, रा. म्हाडा कॉलनी, वार्हे माळवाडी, पुणे) अशा 6 जणांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.
एकूणच वारजे पोलीस स्टेशनच्या गस्तीवरील बीट मार्शल्सने दाखवलेल्या समयसूचकता आणि धाडसामुळे संभाव्य घटना टळली असल्याने, वारजे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरील तरुण एवढ्या रात्री कोयते घेऊन कुठे निघाले होते? त्यांचा उद्देश काय होता? याचा तपास कर्वेनगर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी (PSI Chandrakant Jawalgi) करत आहेत.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84