Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 19 जून 2023 (चेकमेट टाईम्स): भरदुपारी वारजे माळवाडी (Warje Malwadi,
Pune) मधील रामनगर (Ramnagar Warje, Pune)
भागात एका तरुणावर गोळीबार (Firing) करून फरार झालेल्या 3
अल्पवयीन तरुणांना 24 तासांच्या आत जेरबंद करण्यात वारजे पोलिसांना (Warje
Police) यश आले आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे रामनगर भागात मात्र आज पहाटेच्या सुमारास कोयत्याने हल्ला करत 7 वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्यात आली आये. त्यामुळे वारजे परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
शनिवार दि. 17 जून 2023 च्या दुपारचे सुमारास
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधील रामनगर भागात 3 अनोळखी तरुणांनी सुरज लंगर (Firing on Suraj
Langar in Ramnagar Warje) या मुलावर बेछूट गोळीबार करून फरार झाले होते.
यामध्ये सुरजच्या कमरेत एक गोळी शिरली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया (Operation) करून गोळी काढण्यात आलेली असून, सुरजच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे
वारजे पोलिसांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.
दरम्यान सदरील घटना घडल्यानंतर
घटनास्थळी मिळून आलेल्या हल्लेखोरांच्या मोबाईलवरून वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या
गुन्हे शाखेचे तपास पथक गोळीबार करणाऱ्या तरुणांचा रात्रंदिवस कसोशीने शोध घेत असताना,
रविवार दि. 18 जून 2023 दुपारी तपास पथकातील अंमलदार पोलीस नाईक प्रदिप शेलार (Police Naik
Pradip Shelar) व पोलीस कॉन्स्टेबल बंटी मोरे (PC Bunty More) यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराने बातमी दिली की, सदरचे
3 तरुण वारजे येथून लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकल वरून तोंडाला रुमाल बांधून चांदणी
चौकाच्या (Chandani Chowk Pune) दिशेने जात आहेत.
याबाबत खात्रीशीर माहिती मिळताच पुणे शहर
पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णीक
(Joint CP Sandeep Karnik), अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग
प्रविणकुमार पाटील (UCP Pravin Kumar Patil), पोलीस उप-आयुक्त परिमंडळ -3 सुहेल शर्मा (DCP Zone 3 Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भिमराव टेळे (ACP Kothrud Bhimrao
Tele), यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक दगडू हाके (Senior PI Dagadu Hake), गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे (Crime PI Dattaram Bagwe) यांच्या आदेशान्वये तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे
(PSI Narendra Mundhe), रामेश्वर पारवे (PSI Rameshwar Parve),
पोलीस नाईक प्रदिप शेलार (Pradeep Shelar), अमोल
राऊत (Amol Raut), हणमंत मासाळ (Hanumant Masal), पोलीस शिपाई बंटी मोरे (bunty More), श्रीकांत भांगरे
(Shrikant Bhangare), विकी खिलारी (Vicky Khilari) यांच्या पथकाने वेगवेगळ्या टिम तयार करून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या
रस्त्यावर (Chandani Chauk Road) सापळा रचला.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार काहीवेळाने
त्याठिकाणहून तीन तरुण तोंडाला रुमाल बांधून एका पल्सर मोटारसायकल वरून जात असताना,
सापळा रचलेल्या तपास पथकाने संशयितांना हेरले व त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यापैकी
दोन तरुणांच्या कमरेला देशी बनावटीचे दोन गावठी पिस्टल (Hand Made Pistol) मिळून आल्या असून, ताब्यात घेण्यात आलेले तिघेही वारजे माळवाडी भागात
राहणारे असून, तिघेही अल्पवयीन (Minor Criminals) असल्याचे
समोर आले आहे.
भरदुपारी झालेल्या हल्ल्यामागे ही
आहेत कारणे
सदरील हल्ला होण्यामागे तीन कारणे
असल्याचे वारजे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आले असून, ताब्यात
घेण्यात आलेल्यांपैकी एकावर सुरज लंगर याने हल्ला केला होता. त्याचा बदला
घेण्याबरोबरच, 1 जानेवारीच्या पहाटे वारजे माळवाडी मधील विठ्ठलनगर (Vitthal
Nagar, Warje Malwadi, Pune) भागात भूमिपुत्र युवराज कांबळे (वय 20, रा.
सरडे बाग, शिवणे, पुणे)
(Bhumiputra Yuvraj Kambale) याचा खून झाल्याची घटना घडली होती.
त्या खुनाचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला असल्याचे वारजे पोलिसांनी चेकमेट
टाईम्सशी बोलताना सांगितले. तर सुरज हा काही इतर तरुणांबरोबर जास्त राहतो, याचाही
राग हल्लेखोरांच्या मनात होता. या तीन कारणांसाठी हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे
समोर आले आहे.
इकडे तिघांना
अटक; तिकडे रामनगर भागात गाड्यांची तोडफोड
दरम्यान आज सोमवार दि.19 जून 2023
पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वारजे रामनगर भागातील कॅनॉल रस्त्यावर (Canol Road, Ramnagar
Warje) नागेश्वर महादेव मंदिर (nageshwar mahadev mandir) परिसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दोन रिक्षा, एक महिंद्रा झायलो मोटार, एक मारुती इको मोटार,
एक टाटा सफारी मोटारींसह दोन दुचाकी अशा 7 वाहनांवर अज्ञातांनी लोखंडी
कोयत्याने हल्ला करत काचा फोडून वाहनांचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. गोळीबार
झाल्याची घटना घडून दोन दिवस व्हायच्या अगोदर ही आणखीन एक घटना घडल्याने हा नेमका
कशाचा रिप्लाय याचा शोध वारजे पोलीस घेत आहेत.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
पोलीसांची कामगिरी कौतुकास्पद आहे ,
उत्तर द्याहटवापरंतु पोलीसांबद्दल धाक वाटायला हवा,