पुणे, दि. 26 जून 2023
(चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील सहयोगनगर (Sahayog Nagar) आणि गोकुळनगर (Gokul Nagar) पठार भागात झालेल्या
दोन घरफोड्यांमध्ये (Burglaries) जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास
केल्याची घटना घडली आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
यामधील सहयोग नगर पठार भागातील
सर्व्हे क्रमांक 49 मध्ये राहणारे रणजीत सहानी (वय. 54 वर्ष) यांचे घर शनिवार दि.
24 जून 2023 रात्री साडेनऊ ते रविवार दि. 25 जून 2023 सकाळी साडेनऊच्या दरम्यान
फक्त एका रात्रीसाठी बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य
दरवाजाचे कुलूप कशाच्यातरी सहाय्याने उचकटून, घरात प्रवेश करत, घरातील बेडरूम
मध्ये कपाटात ठेवलेले रोख रुपये 30 हजार आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख
34 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे लंपास झाले.
तर दुसऱ्या घटनेत गोकुळ नगर पठार
सर्व्हे क्रमांक 60 मध्ये राहणारे भोंदू नारायण करंदोळकर (वय.56) हे बुधवार दि. 21
जून 2023 सकाळी 9 ते रविवार दि.25 जून 2023 सकाळी साडेसहाच्या दरम्यान घराला कुलूप
लावून बाहेर गेलेले असताना, त्यांच्याही घराच्या मुख्य दाराचे कुलूप अज्ञात
चोरट्यांनी उचकटून घरात प्रवेश करत 35 हजारांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने
असा 55 हजार रुपये किमतीचा मुद्देलाम घेऊन चोरटे लंपास झाले.
दोन्ही घटनांमध्ये एकूण 1 लाख 89
हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
करण्यात आला असून, वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Senior PI Sunil Jaitapurkar),
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी (Crime PI Ajay Kulkarni) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक नरेन मुंडे (PSI Naren Mundhe) पुढील तपास करत आहेत. एकूणच पठार भागात एका मागे एक
घडलेल्या दोन घरफोड्यांच्या घटनांमुळे भागात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिक
आपल्या ऐवजाप्रती चिंतीत असल्याचे दिसते. त्यासाठी या भागातील रात्रीची पोलीस गस्त
वाढवावी अशा प्रकारची मागणी या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84