Type Here to Get Search Results !

यंदा दगडूशेठ गणपती गणेशोत्सवात साकारणार अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती

            Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Timescheckmate news, chekmet news

Dagdusheth ganapati



पुणे, दि. 21 जून 2023 (चेकमेट टाईम्स): श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Shrimant Dagdusheth Halwai Ganapati) सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची (Ram Mandir Ayodhya) प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रीं.ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. पुढील वर्षी सन 2024 मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे, या पार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचे (Pune Ganesh Festival) मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण (Manik Chavan) यांनी पत्रकार परिषदेत दिली.



सणस मैदानासमोरील हिराबाग (Sanas Ground, Hirabaugh) कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा व पूजन कलादिग्दर्शक अमन विधाते (Aman Vidhate) यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे (Dr. Ramachandra alias Balasaheb Paranjape), उपाध्यक्ष सुनील रासने (Sunil Rasane), महेश सूर्यवंशी (mahesh Suryawanshi), हेमंत रासने (hemant Rasane), अमोल केदारी (Amol Kedari), अक्षय गोडसे (Akshay Godase), विश्वस्त विजयकुमार वांबुरे (Vijaykumar Vambure), उत्तम गावडे (uttam Gavade), मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण (Prakash Chavan) यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांच्या उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा श्रीराम मंदिराची प्रतिकृती केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील श्री गणेश व प्रभू श्रीराम भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे.


मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये (Ayodhya Ram Temple Model) 24 खांब व 24 कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून, ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव 11 कळस असणार आहेत.


मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील (Ramayana Pics in Dagadusheth Ganapati Temple) घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. बेलबाग चौकातून (Belbaugh Chowk) प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू (Ramsetu) उभारण्यात येणार आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.



सजावट विभागात 100 कारागिर दिवस-रात्र सलग 75 दिवस कार्यरत राहणार आहेत. मंदिराची प्रतिकृती फायबर (Fiber Model of Ram Mandir Ayodhya) मध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येत असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने श्रीं चे दर्शन घेणे शक्य होणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू (Waikar Brothers), मंडपव्यवस्था काळे मांडववाले  (Kale Mandap) यांनी केली आहे.


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.