Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 23 जून 2023
(चेकमेट टाईम्स): पुणे महापालिका (PMC) हद्दीत समाविष्ट झालेल्या 34
गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी (Asking fund for development in village) व त्यासाठी पुरेसा निधी
उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती (Committee of People's Representatives) गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Ordered by the state
government) घेतला आहे. त्या संदर्भातील आदेश आज काढण्यात आला.
मात्र याला माजी नगरसेवकांनी विरोध करत महापालिकेच्या डोक्यावर दुसरी कोणतीही
समिती नको, अशी मागणी केली आहे.
पुणे महापालिकेत 2017 मध्ये 11, तर 2021 मध्ये 23 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी उरुळी देवाची (Uruli Devachi,Pune) आणि फुरसुंगी (Fursungi,Pune) ही दोन गावे
महापालिकेतून वगळण्यात आलेली आहेत. सद्य:स्थितीत पुणे महापालिकेत 32 गावे आहेत. या गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, कचरा व्यवस्थापन
यासह इतर पायाभूत सुविधांची कमतरता आहे. महापालिका या गावांतील रहिवाशांकडून कर
वसूल करत असली तरी त्या प्रमाणात सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष
निर्माण झालेला आहे.
या पार्श्वभूमीवर
आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केलेली होती. त्यावर सरकारकडून
समाविष्ट गावांमधील प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली
समिती गठीत केली जाईल. त्यात स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींचा समावेश असेल. ही समिती
विकासकामांचा आढावा घेऊन त्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे व कामावर नियंत्रण
ठेवेल, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आलेले होते.
यासंदर्भात
शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे (Nana Bhangire) यांनीदेखील राज्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे
समाविष्ट गावातील प्रश्नांबाबत पत्र लिहिले होते. त्यानुसार राज्याच्या नगर विकास
विभागाने ही समिती स्थापन करावी, असा आदेश आज काढला. याचे
पत्र विभाग आयुक्तांसह महापालिका आयुक्तांनादेखील पाठविण्यात आलेले आहे.
परिणामांची चिकित्सा
न करता समिती गठित
समिती स्थापन
करण्याचा निर्णय बेकायदेशीर असून, 74 व्या घटना दुरुस्तीचे उल्लंघन
करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारावर आघात केला आहे. या समितीमुळे
होणाऱ्या परिणामांची चिकित्सा न करता हा निर्णय झाला आहे. पुणे महापालिकेच्या
डोक्यावर बेकायदेशीर समिती बसवू नये, अशी मागणी माजी विरोधी
पक्षनेते उज्ज्वल केसकर (Ujjwal keskar) , सुहास कुलकर्णी (Suhas Kulkarni) , माजी नगरसेवक
प्रशांत बधे (Prashant Badhe) यांनी केली आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर बधेउपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला
फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे
युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला
ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला
डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे
टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला
शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला
मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला
जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84