Type Here to Get Search Results !

पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर यांचा जाता जाता दणका; शिवणे मधील टोळीवर लावला मोक्का

               Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Timescheckmate news, chekmet news

Terror Gang


पुणे, दि. 22 जून 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यामधील उत्तमनगर परिसरात (Uttam Nagar Police Station) स्वतःची टोळी निर्माण करून दहशत निर्माण करणार्‍या शिर्‍या वाघमारेसह 5 जणांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांनी मोक्का अंतर्गत (MCOCA Action) कारवाई केली आहे.  मोक्का कारवाई करण्यात आलेल्या 5 जणांविरूध्द उत्तमनगर श्री उर्फ शिर्‍या गणेश वाघमारे (Shirya Ganesh Waghmare) ( रा. राहुलनगर, शिवणे, पुणे) (Rahulnagar, Shivane), प्रतिक संजय नलावडे (Pratik Sanjay Nalawade) (रा. गंगा बिल्डींग, कोंढवे-धावडे, पुणे) यांच्यासह 3 अल्पवयीन युवकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तर सादर करी होत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर यांची वारजे पोलीस स्टेशन मध्ये बदली झाली. त्यामुळे जैतापुरकर यांनी जाता जाता मोक्काचा दणका दिल्याच्या चर्चा उत्तमनगर हद्दीत होऊ लागल्या आहेत.


 

शिर्‍या वाघमारे आणि प्रतिक नलावडे यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत म्हणजे येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेवुन रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि. 22 मे 2023 रोजी शिर्‍या वाघमारे आणि त्याचे इतर साथीदार 3 वेगवेगळया मोटारसायकलवरून फिर्यादीच्या घराजवळ गेले. तेथे त्यांनी या परिसरातील पोरांनी आमच्या मित्राला मारले आहे, आज याला मारून टाकणार असे बोलुन लोखंडी हत्याराने फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादीला गंभीर दुखापत झाली. यानंतर पोलिसांनी शिर्‍या वाघमारे आणि त्याच्या साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल केला होता.


 

दरम्यान, शिर्‍या वाघमारे याने परिसरात स्वतःची संघटित टोळी तयार केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याने टोळीतील वेगवेगळे साथीदार सोबत घेवुन गंभीर स्वरूपाचे गुन्हे स्वतःच्या फायद्याकरिता केले. तो आपल्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व वाढवत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. तरी देखील ते धजावले नाहीत. त्यामुळे उत्तमनगर पोलिस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि सध्याचे वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे (Warje Malwadi Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Sr PI Sunil Pandurang Jaitapurkar) यांनी पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांच्याकडे आरोपींवर मोक्का कारवाई व्हावी म्हणून प्रस्ताव सादर केला होता.


 

प्राप्त प्रस्तावाची छाननी झत्तल्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शिर्‍या वाघमारे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांनी पुणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यापासुन आतापर्यंत तब्बल 30 संघटित टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.


 

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सुहेश शर्मा, कोथरूड विभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, विद्यमान वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर (Sr PI Kiran Balasaheb Balwadkar), पोलिस निरीक्षक (गुन्हे) शबनम शेख (PI Shabnam Shaikh), सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार (API Dadaraje Pawar), सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे (API Umesh Rokde), पोलिस अंमलदार तानाजी नांगरे (Tanaji Nangare), अनिरुद्ध गायकवाड (Aniruddha Gaikwad), गणेश हजारे (Ganesh Hajare), समीर पवार (Samir Pawar), परमेश्वर पाडाळे (Parmeshwar Padale) आणि ज्ञानेश्वर तोडकर (Dnyaneshwar Todkar) यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.


 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.