Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 23 जून 2023 (चेकमेट टाईम्स): निरनिराळ्या गुन्ह्यांमध्ये समावेश असलेल्या एकाची वारजे पोलिसांनी (Warje Police Station) तडीपारी केली होती. मात्र तरीही तो हद्दीत येऊन गुन्हेगारी (Warje Crime) कृत्य करत होता. त्यामुळे त्याच्यावर MPDA नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. ही कारवाई मंजूर झालेली असतानाच, तो पुन्हा हद्दीत आला आणि पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या (Anti Extortion Squad Pune Police) हाती लागला. (Pune Crime News)
वारजे रामनगर मध्ये झालेला गोळीबार (Warje Firing Case), त्याचबरोबर वारजे आणि कर्वेनगर मध्ये नुकत्याच घडलेल्या गाड्या फोडाफोडीच्या प्रकरणानंतर पुणे शहर पोलिसांनी वारजे कर्वेनगर (Warje Karvenagar) भागात गस्त वाढवलेली आहे. त्याचबरोबर खबऱ्यांचे जाळे अधिक घट्ट करत, हद्दीत कोणतीही गुन्हेगारी कृत्य होणार नाहीत यावर भर देण्यात आलेला आहे. त्यातच पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार वारजे पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग (Crime Prevention Patrolling) करत आहेत.
दरम्यान खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक विजय कांबळे (Vijay Kambale) आणि पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे (Pramod Sonawane) यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, वारजे पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यातील एमपीडीए मधील गुन्हेगार लखन बिरे (Lakhan Munna Bire) हा आंबेडकर चौक (Ambedkar Chowk), वारजे येथे त्याच्या पत्नीस भेटण्यासाठी आला आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने माहिती मिळालेल्या ठिकाणी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional CP Ramnath Pokle), पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनील पवार (ACP Sunil Pawar) यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (PI Ajay Waghmare) यांच्या सूचनेप्रमाणे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील (API Abhijeet Patil), पोलिस हवालदार संजय भापकर (Sanjay Bhapkar), पोलीस नाईक विजय कांबळे, अमोल आव्हाड (Amol Awhad, किरण ठवरे (Kiran Thaware), प्रमोद सोनवणे, राजेंद्र लांडगे (Rajendra Landge), नितीन कांबळे (Nitin Kambale), दुर्योधन गुरव (Duryodhan Gurav), संभाजी गंगावणे (Sambhaji Gangawane) यांच्या पथकाने सापळा रचून इसम नामे लखन मुन्ना बिरे (वय 26 रा. वारजे जकात नाका, वारजे, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेऊन वारजे पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील जनता मटण शॉप (Janta Mutton Shop) मध्ये 15 मार्च 2023 ला तोडफोड करून, रोख रक्कम लुटल्याप्रकरणी लखन बिरे याला त्याचे साथीदार तडीपार असलेला शुभम अमर रास्ते (वय. 24 वर्ष, रा. वारजे, पुणे) (Shubham Amar Raste) आणि अजय अरविंद यादव (वय. 27 रा. वारजे माळवाडी, पुणे) (Ajay Arvind Yadav) यांना 25 मार्च 2023 रोजी ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली होती. मात्र असे असताना देखील त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती काही केल्या कमी होताना दिसत नसून, ते वारंवार तडीपारी आदेशाचा भंग करत असल्याचे समोर येत असल्याचे दिसते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84