Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 28 जून 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगडाच्या घाट रस्त्यावर (Sinhagad fort road,Pune) कोंढणपूर फाटा (Kondhanpur Fhata) येथे वन विभागाने तपासणी नाका सुरू केल्याने बंदी असताना रात्रीच्या वेळी सिंहगडावर जाणाऱ्यांवर आता आळा बसला आहे. रात्री अपरात्री प्रेमी युगुल व इतर व्यक्ती बिनदिक्कत सिंहगडावर जात असल्याबाबत चेकमेट टाइम्स'ने वन विभागाचे लक्ष वेधून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वन विभागाने कार्यवाही करत हा तपासणी नाका (Inspection nose) उभारला असून रात्रंदिवस या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
सिंहगडाच्या घाट रस्त्यावर पायथ्याशी गोळेवाडी येथे वन
विभागाचा जुना तपासणी (Forest Department checkpost on Sinhagad road) नाका आहे.
रात्रीच्या वेळी या ठिकाणी कर्मचारी तैनात नसल्याने किंवा काही वेळा कोंढणपूर, खेडशिवापूर (Kondhanpur, Khedshivapur) अथवा
इतर गावांची नावं सांगून प्रेमी युगुल किंवा इतर उपद्रवी पर्यटक थेट सिंहगडावर जात
होते.
याबाबत चेकमेट टाइम्स'ने वन विभागाचे लक्ष वेधल्यानंतर गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावर
रात्रपाळीसाठी कर्मचारी (Staff have been appointed for night watch at Golewadi check post) नेमण्यात आले होते. मात्र आजूबाजूच्या गावांतील
नागरिकही हा रस्ता वापरत असल्याने नियंत्रण ठेवण्यात मर्यादा येत होत्या.
त्यामुळे कोंढणपूर फाटा तेथे कायमस्वरूपी तपासणी नाका उभारावा असे चेकमेट टाइम्स'च्या वतीने सुचविण्यात आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करत अद्ययावत तपासणी नाका उभारला आहे. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी कक्ष तयार केला असून सोलर यंत्रणेद्वारे याठिकाणी कायमस्वरूपी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तिन्ही बाजूंच्या रस्त्यांकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून या नाक्यामुळे रात्रीच्या वेळी सिंहगडावर जाणाऱ्यांवर पूर्णपणे आळा बसला आहे.
"गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावरील गेट बंद केल्यानंतर कोंढणपूर, खेडशिवापूर व इतर गावांतील स्थानिकांची गैरसोय होत होती. कोंढणपूर फाटा येथे तपासणी नाका उभारल्याने रात्रीच्या वेळी स्थानिकांची होणारी गैरसोय थांबली आहे. तसेच रात्रीच्या वेळी गडावर जाणाऱ्यांवरही आळा बसला आहे. "सायंकाळी साडेसहा ते सात वाजल्यानंतर कोंढणपूर फाट्यावरून गडाकडे जाणारे गेट बंद करण्यात येते. याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारीही तैनात करण्यात आले असून सोलर पॅनल बसवून विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व परिसरावर नियंत्रण राहील असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चेकमेट टाइम्स'ने सुचविल्यानुसार उपयुक्तता लक्षात घेऊन सुमारे दहा लाख रुपये खर्चून तातडीने हे काम करण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84