Type Here to Get Search Results !

G20 परिषदे साठी मनपा शाळांना खोटा मुलामा...! शाळेत नाही शिक्षक; मनसे ने दिला आंदोलनाचा इशारा

                    Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Timescheckmate news, chekmet news



पुणेदि. 20 जून 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक नसताना, G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर शाळांना रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा फायदा होणार नसून, पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत, मनसेचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे, तन्मय मेमाणे यांच्यासह मनसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.


याबाबत मनसे ने पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला निवेदन देऊन मागण्या केल्या आहेत. पत्रात केलेल्या मागण्यानुसार, पुणे म.न.पा. शाळा क्र. ७४ पंडीत दिनदयाळ इंग्रजी माध्यम या शाळेत (Pandit Dindayal English school) विद्यार्थी पट संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही प्रशासनाकडुन असलेल्या शिक्षकांचा पगार वेळेत होत नाही व गरज असतानाही नवीन शिक्षक मिळत नाही या व इतर समस्यांमुळे गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचीत रहावे लागत असल्याची बाब मनसे'ने निदर्शनास आणून दिली आहे.



सदरील शाळेत शिक्षकांच्या अभावामुळे पुर्व-प्राथमिक २०० विद्यार्थ्यांच्या ठिकाणी १४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे प्राथमिकसाठी ७५० विद्यार्थ्यांच्या ठिकाणी ५७० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे गंभीर वास्तव मनसे ने समोर आणले असून, प्रशासन म्हणुन असलेल्या शिक्षकाचा रखडलेला पगार त्वरीत दया व कायमस्वरुपी नवीन शिक्षक मिळाल्याशिवाय G 20 ची व्हिजीट करु नये अशी मागणी मनसे ने पत्राद्वारे केली आहे.



तर पटसंख्येनुसार त्वरीत कायमस्वरुपी शिक्षक नेमणुक करुन मगच G 20 ची व्हिजीट करावी. सदरील निवेदनाचा विचार न करता G20 ची व्हिजीट दरम्यान काळे झेंडे दाखवुन तिव्र निदर्शन करण्याचा इशारा देखील मनसेने दिला आहे.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.