Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 22 जून 2023 (चेकमेट टाईम्स): दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar Murder Case) (वय.26 रा.राजश्री शाहू बँक, नऱ्हे, पुणे) हिच्या हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) आरोपी सुधीर उर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे (वय 28 रा.हिंगणे होम कॉलनी, दत्त मंदिराजवळ, कर्वेनगर, पुणे, मूळ राहणार - मुक्काम पोस्ट - शहा, ता - सिन्नर, जि - नाशिक) याला (Rahul Handore Arrested) अटक करण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) मधील अंधेरी रेल्वे स्टेशन (Andheri Railway Station) येथून हंडोरेला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्हा कबूल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवसांनी मुंबई येथून त्याला अटक करण्यात आली. एमपीसी उत्तीर्ण (MPSC Passed) झाल्यानंतर घरच्यांनी दर्शनाचा दुसऱ्या एका मुलासोबत विवाह ठरवला होता.
दर्शनाशी विवाह करण्याची इच्छा राहुलची होती. त्यानंतर 'मला वेळ द्या 'अशी विनंती राहुलने तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला. राजगड किल्ल्याच्या (Rajgad Fort, Pune) पायथ्याशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन (Postmortem Report of Darshana Pawar) करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आढळल्यानं तिचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं
राहुल हंडोरे नेमका कुठं होता?
वारजे पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार गायब असलेल्या राहुल हंडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता. पुण्यातून गायब झाल्यानंतर त्याने दोन दिवसांनी नवी दिल्लीतील ATM Centre वरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाला. त्यानंतर कसलिही माहिती न देता त्यानं फोन बंद केला होता. त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कलकत्ता होतं, अशी माहिती समोर आली आहे.
यांनी बजावली कामगिरी
सदर गुन्हयाचा तपास करण्याकरीता पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Superintendent of Police Ankit Goyal,), अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेश घट्टे (Additional Superintendent of Police Pune Division Mitesh Ghatte), उप विभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग भाऊसाहेब ढोल (Deputy Divisional Police Officer Haveli Division Bhausaheb Dhol) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (Police Inspector Avinash Shilimkar of Local Crime Branch), सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे (Assistant Police Inspector Rahul Gawde), पोलीस उपनिरीक्षक प्रदिप चौधरी (Sub-Inspector of Police Pradeep Chaudhary), पोलीस हवालदार रामदास बाबर (Ramdas Babar), हेमंत विरोळे (hemant virole), राजू मोमीन (raju momin), पोलीस नाईक अमोल शेडगे (amol shedge), बाळासाहेब खडके (balasaheb khadake), तुषार भोईटे (tushar bhoite), मंगेश भगत (mangesh bhagat), पोलीस शिपाई दगडु विरकर (dagadu virkar) तसेच वेल्हे पोलीस स्टेशन (velhe police station) येथील सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार (api manoj pawar) यांनी पोलीस हवालदार योगेश जाधव (yogesh jadhav), ज्ञानदीप धिवार (dnyandeep dhiwar), औदुंबर अडवाल (audumbar adwal), राहूल काळे (rahul kale), पोलीस नाईक अजय शिंदे (ajay shinde), पोलीस शिपाई आकाश पाटील (akash patil), पोलीस हवालदार गणेश चंदनशिव (ganesh chandanshiv), पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शेडगे (dnyaneshwar shedage), होमगार्ड विजय घोयने (homegard vijay ghoyane), विक्रांत गायकवाड (vikrant gaikwad) व पोलीस मित्र संतोष पाटोळे (santosh patole) यांची वेगवेगळी पथके तयार करून रवाना केलेली होती, त्यांनी गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
Cause of Darshana Pawar Murder
— Checkmate Times (@checkmate_times) June 22, 2023
Rahul Handore behind bar pic.twitter.com/vC6XpHQoEo
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84