Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 21 जून 2023 (चेकमेट टाईम्स): बंदी असतानाही गोमांसाची बेकायदा वाहतूक व
विक्री केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
त्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या गोमांसाची वाहतूक “पुष्पा” चित्रपटात
रक्तचंदनाची तस्करी दाखवल्याप्रमाणे दुधाच्या टँकर मधून गोमांसाची तस्करी सुरु
असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव-तळेगाव फाट्यावर मंगळवार दि.20 जून 2023 पहाटे
पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून एक टँकर व
मोटारीसह सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमालही जप्त केला. यामध्ये शाहीद कुरेशी
(पूर्ण नाव माहीत नाही) व योगेश रोहिदास गोरडे (दोघेही रा. जुन्नर, पुणे) अशी
ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरडे घेऊन
जाणारा दुधाचा टँकर मंगळवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास वडगाव-तळेगाव फाटा येथे
पकडला. त्यात गाय व बैलाचे मांस आढळून आले. त्यानंतर गोरक्षकांनी पाठलाग करून
मुंढावरे फाटा येथे पकडलेल्या मोटारीतही गाय व बैलाचे मांस आढळून आले. ते कामशेत
पोलिसांच्या मदतीने वडगाव पोलिस ठाण्यात जमा केले. याप्रकरणी दोघांना ताब्यात
घेतले असून दोघे पळून गेले आहेत.
कत्तलीसाठी चाललेल्या दोन गोवंशाची जुन्नर पोलिसांनी केली सुटका
याबाबत गोळेगाव (ता. जुन्नर) येथील गोरक्षक शिवराज विश्वनाथ संगणाळे यांनी फिर्याद दिली. दातखिळेवाडी येथील प्रवीण विश्राम दातखिळे याने सांगितल्यानुसार, बाजीराव सावळेराम पारधी (रा. जुन्नर, पुणे) हा पिक-अप टेंपो मधून (क्र. एमएच 14 डीएम 6230) जुन्नर येथील सलीम कुरेशी व नाजिम हनीफ कुरेशी यांच्याकडे गोवंश कत्तलीसाठी नेत असताना, संगणाळे यांना गोळेगाव येथे आढळला. याबाबत जुन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी टेम्पो व गोवंश ताब्यात घेऊन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84