Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 19 जून 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यामध्ये (Pune Crime) पुन्हा एकदा कोयता गँग (Koyta
Gang) कमालीची सक्रीय झाली असून, या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड
करत आहेत. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Loksabha) येत असलेल्या खडकवासला विधानसभा मतदार संघातील (Khadakwasla
Vidhansabha) महत्वाचा भाग म्हणून परिचित असलेल्या वारजे मध्ये
भरदिवसा एकावर गोळीबार (Firing in Warje) होण्याची घटना घडली
होती. तर त्यानंतर काही तासातच कोयत्याने वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.
या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पोलीस आयुक्त
रितेश कुमार (Pune CP ritesh Kumar) यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच
शहरातील संघटित गुन्हेगारीला (organized crime) आळा घालण्यासाठी
गृहमंत्र्यानी (Home Minister) आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगची दहशत वाढली असून, गाड्या फोडणे, नागरीकांना धमकावून त्यांना मारहाण करणे
असे प्रकार सुरू आहेत. आजही वारजे परिसरात या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा
फोडल्या. या घटनेबाबत सुळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली.
याबाबत त्यांनी त्यांच्या ट्विटर हॅडल वरून ट्वीट देखील केले आहे.
पुणे आणि परिसरात वाढलेल्या या गुन्हेगारीवर आळा घालणे अतिशय गरजेचे असून,
संघटीत गु्न्हेगारीवर कायमचा आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन
उचित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84