Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 21 जून 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे (M.S.R.T.C) विभागातील चालक व वाहक पदासाठीची २०१९ पासून प्रलंबित सरळ सेवा भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, वैद्यकीय चाचणी झालेल्या उमेदवारांची ट्रायल पूर्ण करून पुणे विभागाची अंतिम निवड यादी जाहीर करावी, प्रशिक्षण काळात गाड्यांची संख्या वाढवावी, या मागण्यांसाठी एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या आवारात पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात वैद्यकीय चाचणी झालेले २५०-३०० उमेदवार, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार (Hanumant Pawar), महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान अहमद खान (Ahmad khan), पुणे शहर काँग्रेस प्रभारी विजयसिंह चौधरी (Vijay Singh Chaudhary), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे (Prathamesh Abnave), रोहन सुरवसे (Rohan Suravse), प्रदेश सचिव राजू ठोंबरे (Raju Thombre), संतोष पाटोळे (Santosh Patole), वाहिद नीलगर (Wahid Nilgar), अक्षय माने (Akshay Mane), केतन जाधव (Ketan Jadhav), प्रसाद वाघमारे (Prasad Waghmare), अजित ढोकळे (Ajit Dhokle), मुरली बुद्धाराम (Murali Buddharam), विकार शेख (Vikar Shaikh), रमेश कांबळे (Ramesh Kamble), सुजित गोसावी (Sujit Gosavi), आदिनाथ जावीर (Adinath Javier) आदी उपस्थित होते. एसटी महामंडळाचे प्रभारी विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राहुल शिरसाठ म्हणाले, "एसटी महामंडळाने २०१९ मध्ये १२ विभागांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली. मात्र, पुणे विभागात वैद्यकीय चाचणी होऊनही ट्रायल न झाल्याने, तसेच ट्रायल ट्रॅक नसल्याने त्यांची भरती प्रक्रिया चार वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे ट्रायल लवकरात लवकर घेऊन ही भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी नियंत्रकांकडे केली. या मागणीला सकारात्त्मक प्रतिसाद मिळाला असून, येत्या ५ तारखेपासून ट्रायल सुरू करण्याचे आश्वासन विभागीय नियंत्रकांनी दिले आहे." शिरसाठ यांच्या पुढाकाराने या तरुणांना न्याय मिळाला, असे सांगत एहसान अहमद खान यांनी शिरसाठ यांचे कौतुक केले.
उमेदवार, पुणे विभागात १६४७ पदांसाठी ही भरती होती. अकरा विभागांची भरती पूर्ण झाली असून, पुणे विभागात ती रखडली आहे. ही भरती प्रक्रिया लवकर सुरु करावी, तसेच प्रशिक्षणासाठी बस उपलब्ध कराव्यात, ट्रायल ट्रॅक सुरु करावा, मुलांच्या अंतिम याद्या जाहीर कराव्यात, यासाठी अनेकवेळा आंदोलन केले. आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर महाव्यवस्थापकांनी परिपत्रक काढले होते. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नव्हती. युवक काँग्रेसच्या सहकार्याने आज केलेल्या आंदोलनामुळे विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून ५ जुलैपासून भरती प्रक्रिया सुरु करण्याचे आश्वासन दिल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84