Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 28 जून 2023 (चेकमेट टाईम्स): चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य
पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी पुणे-सातारा (Pune, Satara)
राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर दि 4 जुलै
2023 ते दि 15 जुलै 2023 या कालावधीत रात्री 12:30 ते पहाटे 3:30 वाजेपर्यंत तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्याने नियंत्रित
करण्याचा निर्णय आज बुधवारी दि 28 जुलै 2023 रोजी
घेण्यात आला.
या कालावधीत
नागरिकांनी पर्यायी सेवा रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश
देशमुख यांनी केले आहे. चांदणी
चौकातील (Chandnichowk,
Pune) पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Desmukh) यांच्या उपस्थितीत
दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे (Pune) ग्रामीणचे
पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal), पुणे शहर वाहतूक
शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय
कदम (Sanjay kadam), पिंपरी चिंचवडचे सहायक आयुक्त वाहतूक
विठ्ठल कुबडे (ACP Vitthal kubade) आदी उपस्थित होते.
भारत
सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एनएचएआयच्या भारतमाला
परियोजने अंतर्गत पुणे शहरातील चांदणी चौक जंक्शनवर एकात्मिक संरचना पूलाचे
बांधकाम करण्यात येत आहे. या चांदणी चौक प्रकल्पाचे 95 टक्के काम
पूर्ण झाले असून ते अंतिम टप्यात आहे.
नवीन
एनडीए- पाषाण (NDA-Pashan)
मुख्य पुलाचे (व्हेहीक्युलर ओव्हर पास- व्हीओपी) काम सबस्ट्रक्चर
पातळीपर्यंत झाले असून सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने हा
वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त मल्टी ॲक्सेल वाहनांची
वाहतूक 3 तासांसाठी रोखण्यात येणार आहे. ही वाहने योग्य त्या
ठिकाणी थांबवली जातील किंवा त्या कालावधीत इत्तर मार्गाचा अवलंब केला जाईल.
या
कालावधीमध्ये मुख्य महामार्गावरील (मेन कॅरेजवे) वाहतूक बंद केल्यानंतर हलकी वाहने, बस आणि ट्रक
दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचा वापर करतील. मुंबईकडून सातारा/ कोथरुडकडे
जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेले सेवा रस्ता व रॅम्प - 6 चा वापर करतील. तसेच सातारा व कोथरुड (Satara and Kothrud) (पुणे शहर) मार्गे मुंबई व मुळशीकडे (Mulshi, Pune)
जाण्यासाठी वेदभवन बाजूने नव्याने तयार करण्यात आलेला सेवा रस्ता व रॅम्प- 8
चा वापर करण्यात यावा. इतर वाहतुकीत कोणताही बदल नाही. त्यामुळे
कुठलीही वाहतूक थांबणार नाही, अशी माहिती प्रकल्प संचालक कदम
यांनी दिली.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब
करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84