Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 26 जून 2023 (चेकमेट टाईम्स): किकवी मोरवाडी
ता.भोर (Kikwi
Morwadi,bhor) गावच्या हद्दीत रस्त्याच्या चालु असलेल्या कामा लगत
उभा राहीलेल्या टेम्पो मधुन सुमारे 55 लाख 79 हजार 600 रुपयांचा
प्रतिबंधीत सुंगधी तंबाखुचा (Tabbaco Gutka) गुटखा मिळुन आल्याने सुमारे 18 लाखाच्या टेम्पोसह 73 लाख 85 हजाराचा मुद्देमाल
पोलिसांनी जप्त केला असुन या प्रकरणी चौघांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे तर
एकास अटक करण्यात आली आहे.
किकवी मोरवाडी येथील
रस्त्यालगत थांबलेल्या टेम्पो मधुन गुटख्याचा उर्ग वास येत असुन त्यात मोठ्या
प्रमाणावर गुटखा असण्याची शक्यता असल्याची माहीती जिल्हा गु्न्हे शाखेचे पोलिस
निरीक्षक अविनाश शिळीमकर (PI Avinash
Shilimarkar) यांना मिळाल्यावर त्यांनी जिल्हा गुन्हेशाखेच्या
पथकासह राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील (PI Sachin Patil) ,सहाय्यक पोलिस
निरीक्षक नितीन खामगळ (API Nitin Khamgal) व पोलिस कर्मचारयांसह सदर थांबलेल्या टेम्पो (MH 07 AJ 2943) ची तपासणी केली.
असता त्या मध्ये
पांढरया व सुतळीच्या पोत्या मध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याचे अढळुन आले या
वेळी टेम्पो समवेत असलेला व्यक्ती ऋत्विक दशरथ मोरे (Rushikesh Dashrat More) वय 24 रा.मोरवाडी ता.भोर (Morewadi,Bhor) यास ताब्यात घेऊन
चौकशी केली असता हा टेम्पो व त्यातील गुटखा सुधाकर कल्याण पानसरे (Sudhakar
kalyan Pansare) व दिनेश कल्याण पानसरे (Dinesh kalyan
Pansare) दोघे रा.शिवरे यांचा असुन पुणे येथे नजीम (पुर्ण नाव पत्ता
नाही) या व्यक्तीस विकण्यासाठी चालवल्याचे समजले.
पोलिसांनी टेम्पोची
कसुन चौकशी केली असता टेम्पोचा क्रमांक MH 07 Aj 2943 शिवाय MH 12 TV 8247 या नंबरच्या
पिवळ्या रंगाच्या दोन नंबर प्लेट टेम्पो मध्ये मिळाल्या आहेत टेम्पो ला बोगस नंबर
प्लेट लावुन या गुटख्याची वाहतुक होत असल्याचे या वेळी निष्पन्न झाले.
पोलिसांनी टेम्पो
मधील विमल,रजनीगंधा व सुगंधी तंबाखु गुटख्याचा माल एकुण किंमत रुपये 73 लाख 85 हजार 400 रुपये,वाहतुक करणारा
टेम्पो किंमत 18 लाख रुपये,टेम्पो मध्ये अढळलेली नंबर
प्लेट किंमत एक हजार रुपये व टेम्पो मधील मोबाईल किंमत पाच हजार रुपये असा एकुण
माल किंमत 73 लाख 85 हजार 400 रुपये पंचासमक्ष
पंचनामा करुन ताब्यात घेतला असुन टेम्पो समवेत असलेला ऋत्विक दशरथ मोरे यास अटक
केली आहे तर इतर सुधाकर पानसरे,दिनेश पानसरे व खरेदीदार
नजीम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी जिल्हा गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार हनुमंत पासलकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असुन पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर पुढील तपास करत आहेत. चौकसीसाठी (जप्त केलेला गुटखा ठेवायला जागा नाही) राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे सातारा महामार्गावर (Pune Satara Highway) गेले काही दिवसा पासुन धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला गेला आहे.
परंतु राजगड पोलिस
ठाण्यास पुरेशी जागा नसल्याने जप्त केलेला गुटखा कुठे ठेवायचा हा प्रश्न निर्माण
झाला आहे काही दिवसापुर्वी जप्त केलेला गुटखा ट्रकसह चोरट्यांनी गायब केला होता
त्यातील निम्मा गुटखापोलिसांनी परत हस्तगत केला होता या घटनेच्या पार्श्वभुमीवर
जप्त केलेला गुटखा सुरक्षित ठेवायचा कुठे हा प्रश्न राजगड पोलिसां समोर पडला आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84