Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 22 जून
2023 (चेकमेट टाईम्स): पावसाळा सुरु होण्याची तारीख उलटून गेली, मात्र उन्हाळा संपण्याचे नाव घेत नसताना, वारजे माळवाडी (warje malwadi) मधील एका ट्रान्सफार्मरला आग (Fire at a transformer in
Warje Malwadi) लागण्याची घटना घडली. यामुळे वारजे माळवाडी मधील
मोठ्या प्रमाणातील रहिवासी क्षेत्र बाधित होऊन वीज पुरवठा खंडित (Power
supply Failed in warje malwadi) झाला. त्यामुळे अगोदरच
दिवसाच्या गरमीने वैतागलेले वारजेकर मध्यरात्रीच्या वेळेला खंडित झालेल्या
वीजपुरवठ्यामुळे बंद झालेले पंखे आणि वातानुकूलन यंत्रणेची हवा बंद झाल्याने आणखीन
वैतागले.
झाले असे की, बुधवार दि. 21
जून 2023 रोजी रात्री पावणे बारा (11.45) च्या सुमारास, वारजे माळवाडी मधील अष्टविनायक चौक येथील (Ashtavinayak Chowk, Warje
Malwadi) ट्रान्सफार्मरला आग लागण्याची घटना घडली. यावेळी अनेक
वारजेकर संध्याकाळचे जेवण उरकून शतपावली करत होते. कोणी आईस्क्रीम खायला चालले
होते, कोणी आईस्क्रीम
खाऊन घराकडे जात होते. मात्र अचानक दिवाळीच्या फुलबाज्या पेटाव्यात तसा अष्टविनायक
चौकातील ट्रान्सफार्मर (Power Supply Off Due to Fire at transformer) बघता बघता पेटला, नव्हे तर त्याचा चांगलाच भडका उडाला. त्यामुळे शतपावली करणाऱ्या सगळ्यांचीच
धावपळ उडाली आणि तेवढ्यात बत्ती गुल्ल झाली.
या अचानक झालेल्या अंधारामुळे शतपावली करिता असतील, की आईस्क्रीम खाण्याकरिता घरातील ज्येष्ठांबरोबर
आलेल्या लहान मुलांची पुरती घाबरगुंडी उडाल्याचे पाहायला मिळाले. कसे तरी घरी
गेलेल्या आणि अगोदरच घरात असलेल्या वारजेकरांना येईल थोड्या वेळात लाईट असे वाटत
होते. मात्र त्यांची निराशा झाली. अनेकांना पहाटे पर्यंत जागावे लागले, तर काहींची रात्रच सकाळी वीज पुरवठा सुरळीत
झाल्यावर झाली. एकूणच या अचानक खंडित (power failure) झालेल्या वीजपुरवठ्याने वारजे माळवाडी मधील
नागरिक मात्र विज वितरण कंपनीच्या कारभारावर संतप्त झाले.
याबाबत महावितरण’ने (Mahavitran) दिलेल्या माहितीनुसार वारजे माळवाडी मधील अष्टविनायक चौकात असलेल्या
लघुदाब वहिनी मध्ये रात्री 11.45 च्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने, तेथील ट्रान्सफार्मरला आग लागली. त्यामुळे तो
ट्रान्सफार्मर बंद होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा भार
विस्थापित झाल्याने कालांतराने रात्री 1 ते 1.30 च्या दरम्यान एकामागे एक असे
वारजे माळवाडी परिसरातील सहा ट्रान्सफार्मर बंद पडले होते. मात्र महावितरणच्या
वारजे विभागातील कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून मध्यरात्री 3.30 च्या
दरम्यान बंद पडलेल्या 6 ट्रान्सफार्मर पैकी 3 ट्रान्सफार्मर सुरु करून काही
भागातील वीजपुरवठा सुरु केला. तर सकाळी 6.30 पर्यंत सर्वच्या सर्व 6 ट्रान्सफार्मर
सुरु होऊन, सर्व वीजपुरवठा
सुरळीत करण्यात वारजे विभागाला यश आल्याचे महावितरणने (MSEDCL) चेकमेट टाईम्सशी बोलताना
सांगितले.
दरम्यान, जळालेला
ट्रान्सफार्मर बदलताना, गुरुवार असूनही
कोणत्याही भागातील वीजपुरवठा खंडित न करता बदलण्यात येणार असल्याचे देखील महावितरण
कडून स्पष्ट करण्यात आलेले असून,
अपवादात्मक परिस्थितीत काही मिनिटांसाठी वीज पुरवठा खंडित ओऊ शकतो, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84