Type Here to Get Search Results !

वारजे हायवेवर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला ट्रकने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


warje highway accident


पुणे, दि. 11 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर हायवे (Katraj Dehuroad Bypass) ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ट्रकने धडक दिल्याने, त्याचा जागीच मृत्यू (Padestrians Fatal Accident by Truck) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

 

 

याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवार दि.11 जुलै 2023 सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास, कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरून ट्रक क्र. TN 52 AA 9876 चांदणी चौकाकडून कात्रजच्या दिशेने (Chandani Chowk to Katraj) जात असताना, वारजे मधील अतुलनगर (Atul Nagar, Warje Malwadi, Pune) समोर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला उताराने वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. उतार असल्याने अगोदरच वेगात असलेल्या ट्रक बरोबर पादचारी फरफटत गेल्याने, त्याचा गंभीर जखमी (seriously injured) होऊन जागीच मृत्यू झाला. यानंतर वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार निखील सोनार यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक राधाकृष्णन मुरुगेश (वय.35 रा. जिटानढाहाली, धरमपुरी, तामिळनाडू) (Radhakrishnan Murugesh) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

अपघाताबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Senior PI Sunil Jaitapurkar), सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर (API Bapu Raikar) यांच्या पथकाने तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमीस ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) हलवले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने जखमी व्यक्तीचा रुग्णालयात आणण्यापुर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. बाबासाहेब देवराम उदावंत (वय 55 रा. फ्लॅट नंबर 502, चक्रधर सोसायटी, मानाजी नगर, नऱ्हे, वडगाव, पुणे) (Babasaheb Devram Udavant) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी वारजे वाहतूक विभागाने (Warje Traffic) सोडवत वाहतूक सुरळीत केली.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.