Type Here to Get Search Results !

पालकमंत्र्यांच्या मतदार संघात अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; साडे तीन किलो बंटा, आतपाव गांजासह एकजण ताब्यात

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
om sai pan shop karvenagar pune
कारवाई नंतरही सुरु असलेले दुकान

पुणे, दि. 10 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था (Education Hub Pune) असल्याने बाहेरील मुला मुलींचे शहरातील राहण्याचे आवडते ठिकाण असलेल्या कर्वेनगरच्या (Karvenagar) कॅनॉल रस्त्यावरील (Canol Road) एका पान टपरी (Pan Shop) मधून अंमली पदार्थांचा (intoxicants) मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कर्वेनगर आता शैक्षणिक संस्थांचे शहरातील मुख्य ठिकाण असल्याच्या नावाबरोबरच बेकायदेशीर धंद्यांचे देखील मुख्य ठिकाण असे नावलौकिक मिळवते की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वेनगरच्या कॅनॉल रस्त्यावरील गल्ली क्रमांक 8 च्या (Lane No.8 Karvenagar Pune) समोर असलेल्या “ओम साई पान शॉप” (Om Sai Pan Shop) या पान टपरी मध्ये बंदी असलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे विकले जात असल्याची माहिती पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक 1 (Anti Narcotics Cell Pune) ला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह-पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उप-आयुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड (PI Vinayak Gaikwad), सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर (API Shailaja Jankar), पोलिस अंमलदार मारूती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, सचिन माळवे, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, नितेश जाधव, रेहाना शेख, संदेश काकडे आणि योगेश मोहिते यांच्या पथकाने पान टपरीवर धाड टाकली.

 

 

“ओम साई पान शॉप” या पान टपरी मध्ये बंदी असलेले 110 ग्रॅम गांजा (Ganja) आणि 3 किलो 515 ग्रॅम बंटा (Banta) मिळून आल्याने, तो जप्त करण्यात आला आहे. तर रामबाबु देवनारायण महतो (वय 31, रा. कर्वेनगर, कॅनोल रोड, गल्ली नं. 8 च्या समोर, पुणे. मुळ रा. रोहुवा, जि. सातावाडी, पोस्ट पोहबारवा, बिहार) (Ram Babu Devnarayan Mahato) असे अटक केलेल्या पान टपरी चालकाचे नाव आहे. त्याच्याकडून मोबाईल फोन’सह एकुण 47 हजार 350 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वारजे माळवाडी पोलिस स्टेशन मध्ये (Warje Malwadi Police Station) एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

काही दिवसांपूर्वीच याच पान टपरी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात गाड्या फोडण्याची घटना घडली होती. तर चार जणांवर जीवघेणा हल्ला देखील झाला होता. त्यानंतर कर्वेनगर मधील दुधाने लॉन्स (Dudhane Lawns) रस्त्यावर एका हातभट्टी विक्रेत्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Social Security Cell Pune) पथकाने टाकलेल्या धाडीत तब्बल 500 लिटर गावठी दारू (Local Liquor) आढळून आली होती. त्यानंतर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मिळून आल्याने कर्वेनगर “नशा नगर” झाले की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. तर दस्तुरखुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांच्या कोथरूड विधानसभा मतदार संघात (Kothrud Vidhansabha) एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.