Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 26 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): प्लॉटिंग मध्ये पैसे
गुंतवणूक करून (Investment in Land Plotting), एका महिन्यात दामदुपटीने
पैसे (Double Money Scheme) मिळवून देण्याचे अमिष दाखवून,
ग्राहकाची फसवणुक (Fraud Case) केले प्रकरणी वारजे मधील दोन
बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध (Builders in Warje) गुन्हा
दाखल करून, त्यातील एकाला अटक करण्यात सिंहगड रोड पोलिसांना (Sinhgad Road
Police) यश आले आहे. तर एक जण अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या
बांधकाम व्यावसायिकाकडून जवळपास साडेनऊ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात
आले आहेत. या टोळीवर यापूर्वी देखील 2015 मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, एप्रिल 2022 मध्ये वर्तमान पत्रामध्ये (Newspaper Advertise)
आलेल्या जहिरातीवरील मोबाईल नंबरवरून फिर्यादी यांनी त्याचेवर संपर्क साधला असता,
मोबाईलधारकाने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन मी केलेल्या प्लॉटिंग
मध्ये पैसे गुंतवा. तुम्हाला एका महिन्यात दामदुपटीने पैसे मिळवुन देतो असे आमिष
दिले होते. यामध्ये तुमच्याकडील सोन्याचे दागिने मला दया. मी त्यावर लोन (Gold
Loan) काढुन ते पैसे गुंतवतो, असे सांगुन त्यांना विश्वासात घेवून फिर्यादीकडुन
19 तोळे सोन्याचे दागिने व रोख 3 लाख 50 हजार रुपये घेवून, सदरील बांधकाम
व्यावसायिकांची जोडगोळी मागील एक वर्षापासुन सदरचे पैसे व सोने घेवुन स्वतःचे अस्तिव
लपवुन फिर्यादी यांना गुंगारा देत होता.
याबाबत दोन्ही बांधकाम
व्यावसायिकांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याच्या अनुषंगाने सदर गुन्हयाचा अधिक तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस
निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) हे करीत असताना, तांत्रिक विश्लेषण
(Technical Analysis) व गोपनिय बातमीदारमार्फत आरोपीचा शोध घेत असताना,
तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल पाटील (Amol Patil), देवा चव्हाण (Deva Chavan) यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत
बातमी मिळाली की फसवणूक प्रकरणाच्या गुन्हयातील पाहीजे संशयित हा दौंड (Daund) तालुक्यातील डाळींब (Dalimb Village) या ठिकाणी आहे.
सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड
रोड पोलीस स्टेशन पुणे यांना कळवून परिमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail
Sharma), सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे
(ACP Rajendra Galande), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (PI
Abhay Mahajan), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर
(PI Jayant Rajurkar) यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन
निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh
Mokashi), आबा उतेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे,
देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, सागर
शेडगे, अविनाश कोंडे, राहुल ओलेकर,
शिवाजी क्षिरसागर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, नलीन येरुणकर यांचे पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर
डाळिंब या गावात घुसून, संशयिताला चारही बाजूने घेरून, ताब्यात घेतले.
दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या
संशयिताचे नाव आनंद नारायण पावसकर (वय 36, रा. तिरुपतीनगर,
वारजे नाका, वारजे, पुणे)
(Anand Narayan Pawaskar) असे असून, त्याने फसवणुकीबाबत दिलेल्या कबुलीवरून
सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे आणून अटक केल्यानंतर, त्याचेकडे अधिक चौकशी करता, त्याच्याकडून
फसवणुक करुन नेलेले 9 लाख 30 हजार रुपये किमतीचे 19 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात
पोलिसांना यश आले आहे. तर त्याचा साथीदार प्रथमेश प्रभाकर पावसकर (Prathamesh
Prabhakar Pawaskar) अद्याप फरार आहे. पुढील तपास सहायक पोलीस
निरीक्षक सचिन निकम करत आहेत.
या टोळीचे फसवणुकीचेच
धंदे
स्वस्त दरात आकर्षक फ्लॅट
देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 10 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी
मे 2012 मध्ये देखील कृष्णा विनायक पावसकर (Krushna Vinayak
Pawaskar), आनंद नारायण पावसकर आणि प्रथमेश प्रभाकर पावसकर या
तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी धरमवीर ईश्वरचंद अगरवाल (रा. इंद्रायणीनगर,
भोसरी) (Dharmaveer Ishwarchand Agarwal) यांनी
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन (Vishrantwadi Police Station)
मध्ये फिर्याद दिली होती. जानेवारी 2015 ते एप्रिल 2015 या कालवधीत धानोरी येथील “श्री
गणेश अपार्टमेंट”च्या (Shree Ganesh Apartment Dhanori) साइटवर
हा प्रकार घडला होता. यामध्ये आनंद पावसकर आणि त्यांच्या दोन साथीदारांनी फिर्यादींचा
विश्वास संपादन केला. आपल्या मालकीच्या जागेवर इमारतीचे काम सुरू असल्याचे सांगितले.
त्यानुसार पैसे घेऊन उंड्री (Undri) येथे दीड वर्षापूर्वी बांधकाम
झालेल्या साइटवर कोऱ्या पावत्या देऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात
आले होते.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84