Type Here to Get Search Results !

उत्तमनगर मध्ये तब्बल 29 लाख रुपयांची घरफोडी; दोन तासात चोरट्यांचा धुमाकूळ

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


uttam nagar police station burglary


पुणे, दि. 10 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttam Nagar Police Station) हद्दीतील न्यू कोपरे (New Kopare) गावात अज्ञात चोरट्यांनी अवघ्या दोन तासात घरफोडी (Burglary) करून, तब्बल 29 लाख 5 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अगोदरच वारजे (Warje Police Station area) मध्ये एकामागे एक घरफोड्यांचे सत्र सुरु असताना, आता शेजारील उत्तमनगर भागात मोठी घरफोडी झाल्याने या भागात चोरट्यांचा सुळसुळाट झालाय का? अशी भिती नागरिकांच्या मनात दाटून आली असून, पोलीस गस्त (Police Patroling) वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. (Pune Crime News)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवार दि.10 जुलै 2023 पहाटे बारा ते सव्वा दोनच्या दरम्यान, न्यू कोपरे गावातील तक्रारदारांचे घर कुलूप लावून बंद असताना, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उचकटून, घरात प्रवेश करत, बेडरूम मधील कपाटात ठेवलेले रोख 12 हजार रुपये, 1 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने असा एकूण 29 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला.

 

 

याबाबत अक्षय नाणेकर (वय.30 रा. न्यू कोपरे गाव, पुणे) (Akshay Nanekar) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक उमेश रोकडे पुढील तपास करत आहेत. सदरील चोरीच्या घटनेबाबत माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.