Type Here to Get Search Results !

शिवणे मधील पावशेर सोने आणि दीड लाखांची रोकड चोरीला गेलेल्या घटनेला झाले 10 महिने; अद्याप नाही लागला चोरट्यांचा शोध

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

cash and gold robbery in shivane uttam nagar police station


 

पुणे, दि. 14 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) हद्दीतील शिवणे (Shivane) मधील कदम वस्ती (Kadam Vasti) भागातील एका घरात भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडी (burglary in shivane) मध्ये तब्बल 245 ग्राम सोने आणि 1 लाख 56 हजारांची रोकड चोरीला गेली होती. या घटनेला आता 10 महिने पूर्ण झालेले असून, अद्याप चोरट्यांचा शोध लागलेला नसल्याने बांधकाम व्यावसायिक हवालदिल झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी न्यू कोपरे (new kopare) मध्ये देखील अशाच प्रकारे मोठी घरफोडी झाल्याने, पोलीस प्रशासन नेमके काय करते आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (Pune Crime News)

 

 

14 सप्टेंबर 2022 दुपारी 12.30 ते 3.30 दरम्यानच्या भर दिवसाच्या 3 तासात बांधकाम व्यावसायिक सिद्धार्थ एकनाथ कदम (वय.42 रा. लक्ष्मी निवास, कदम वस्ती, शिवणे, पुणे) (Siddhartha Eknath Kadam) हे कुटुंबियांसह नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भोसरी (Bhosari) येथे गेले असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या कुलुपबंद असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत, बेडरूम मधील कपाटात ठेवलेल्या पितळी डब्यासह त्यातील 245 ग्राम सोन्याचे दागिने आणि 1 लाख 56 हजारांची रोकड घरफोडी (Gold and Cash Robbed from House) करून, चोरून नेली होती. या घटनेला आज बरोबर 10 महिने पूर्ण झाले आहेत.

 

 

त्यातच सोमवार दि.10 जुलै 2023 पहाटे बारा ते सव्वा दोनच्या दरम्यान, न्यू कोपरे गावातील तक्रारदारांचे घर कुलूप लावून बंद असताना, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उचकटून, घरात प्रवेश करत, बेडरूम मधील कपाटात ठेवलेले रोख 12 हजार रुपये, 1 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने असा एकूण 29 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेल्याची घटना घडली. त्यामुळे या भागातील बांधकाम व्यावसायिक, शेतकरी धास्तावले (Farmers and Builders under Threat) असून, त्यांच्या ऐवजाची चिंता त्यांना सतावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर या भागात पोलिसांची गस्त (Police Patroling) वाढवण्याबरोबरच महानगरपालिकेने सीसीटीव्हीचे (CCTV by PMC) प्रमाण वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.