Type Here to Get Search Results !

बजरंग दलाच्या गोरक्षकांमुळे 6 गोवंशाला मिळाले जीवदान; कोंढवे धावडे मधील घटना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

Bajrang Dal's cow guards saved 6 cows' lives; Incidents in Kondhve Dhwade


 

पुणे, दि. 19 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): बजरंग दल उत्तमनगर (Bajarang Dal Uttam Nagar Pune) गोरक्षकांच्या समय सुचकतेमुळे 6 देशी गोवंशाची कत्तलीपासून सुटका (Escape from Slaughter) झाली. यातील 2 गोवंश तस्करीच्या (Cattle Smuggling) माध्यमातून टेंपो मधून कोंढवे धावडे गावातील कत्तलखान्यावर (Slaughterhouse Kondhave Dhawade) नेण्यात येत असताना, गोरक्षकांनी टेम्पोचा पाठलाग केला. यामध्ये टेंपो मधील 2 आणि कत्तलखान्यात बांधण्यात आलेल्या 4 गोवंशाची सुटका करण्यात गोरक्षकांना यश आले आहे. याबाबत दोघांवर महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम 1976 (Maharashtra Animal Protection Act 1976) आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 (Prevention of Cruelty to Animals Act 1960) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

रविवार दि. 16 जुलै 2023 पहाटे 4 वाजून 11 मिनिटांनी सदरील बाब उघडकीस आली. न्यू कोपरे गावातून 2 गोवंश तस्करी करून, कोंढवे धावडे मधील कत्तल खाण्यात नेण्यात येत होती. ही माहिती मिळताच, बजरंग दल उत्तमनगरच्या गोरक्षकांनी तत्काळ पोलिसांच्या 112 क्रमांकावर याबाबत माहिती देत, कोंढवे धावडे मधील भीमनगर (Bhim Nagar Kondhave Dhawade) भागात असलेल्या कत्तलखान्याच्या दारात सदरील टाटाचा छोटा हत्ती (Tata ACE) प्रकारातील MH 16 AY 9502 क्रमांकाचा टेंपो गस्तीवरील पोलीस कर्मचारी भास्कर तांदळे आणि मालुसरे या गस्तीवरील पोलिसांच्या मदतीने पकडला.

 


 

यावेळी पोलिसांनी तेथे असलेल्या टेंपो चालक मलिक शकील शेख (वय.26 वर्षे, रा. निजामुद्दीन कुरेशी यांच्या येथे भाड्याचे घर, जिलानी मस्जिद जवळ, भीमनगर, कोंढवे धावडे, पुणे) (Malik Shakil Shaikh) याच्याकडे प्राणी वाहतुकीचा परवाना आहे का याची विचारणा केली असता, त्यांच्याकडे तो नव्हता. तसेच नौशाद कुरेशी (Naushad Kureshi) याने सदरील प्राणी कत्तलीसाठी आणलेली असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

या कारवाई मध्ये 2 गोवंश बांधलेल्या अवस्थेत मिळून आले. तर त्याच्याच शेजारी असलेल्या कत्तलखान्याची पाहणी केली असता, तेथे 2 गाई आणि 2 वासरे अशी 4 जनावरे, कोणतेही चारा पाणी उपलब्ध करून न देता, निर्दयीपणे दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत मिळून आली. यामध्ये 1 पांढऱ्या रंगाचा, अंदाजे 3 वर्षे वयाचा बैल, अंदाजे 5 वर्षे वयाच्या 2 आणि 6 वर्षे वयाची 1 अशा 3 तांबड्या रंगाच्या गाई, 1 वर्षाचे तांबड्या रंगाचे 1 खोंड आणि तोंडावर पांढरे पट्टे असलेली काळ्या रंगाची अंदाजे 5 महिन्याची 1 कालवड, अशा एकूण 52 हजार रुपये किमतीचा गोवंश सुटका करत, उत्तमनगर पोलीस स्टेशनला (Uttam Nagar Police Station) आणून, नंतर पांजरपोळ गोशाला भोसरी (Panjarpol Goshala Bhosari) या ठिकाणी हलवण्यात आले. त्याचबरोबर तस्करीसाठी वापरण्यात आलेला MH 16 AY 9502 क्रमांकाचा टेंपो जप्त करण्यात आला आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.