Type Here to Get Search Results !

वारजे पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिग ऑपरेशन; 56 गुन्हेगार तपासले 1 तडीपार हत्यारांसह ताब्यात

 

combing operation by pune city police in warje police station area

पुणे, दि. 6 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Pune Ritesh Kumar) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये (jurisdiction of Pune Police Commissionerate) “ऑल आऊट ऑपरेशन” (All out operation) कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करणे तसेच हॉटेल, लॉज, ढाबे, एसटी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन, तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत इसम, घटना इत्यादी कसून तपासणी करणे (Examine of Criminals) बाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे पुणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामधे गुन्हे शाखा (Crime Branch) व पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांची पथके स्थापन करुन पुणे शहरातील वेगवेगळया परीसरात सोमवार दि. 3 जुलै 2023 रोजी रात्री 10 वाजल्यापासून मंगळवार दि. 4 जुलै 2023 पहाटे 2 वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन व तपासणी करुन 1 हजार 832 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून, त्यापैकी 639 गुन्हेगार मिळुन आले आहेत. (Pune Crime News)

 

 

या विशेष मोहिमे दरम्यान वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) हद्दीत 6 अधिकारी, 23 अंमलदार, युनिट 3 चे पथक, खंडणी विरोधी पथक (Anti Extortion Squad), दरोडा प्रतिबंधक पथकाच्या (Robbery Prevention Squad) संयुक्त विद्यमाने केलेल्या कारवाई मध्ये, वारजे रामनगर (Warje Ramnagar), सहयोग नगर (Sahyog Nagar), गोकुळनगर पठार (Gokul Nagar), म्हाडा कॉलनी (Mhada Colony Warje Malwadi), वडारवस्ती (Vadar Vasti, Karvenagar), संभानगर (Sambha Nagar, Karvenagar) आणि सर्व वस्ती भागातील 3 लॉज, 4 हॉटेल, 2 मस्जिद, 5 मंदिरे या भागात तपासणी करण्यात आली. दरम्यान हद्दीतील 56 गुन्हेगार तपासण्यात आले. यामध्ये 13 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर 1 तडीपार गुन्हेगार हत्यारासह मिळून आला. त्याला आर्म ऍक्ट (Arm Act) खाली अटक करण्यात आली. ऋषिकेश शंकर केदारी (वय 20, रा. बालाजी मेडिकल समोर, रामनगर, वारजे, पुणे) (Hrishikesh Shankar Kedari) असे त्या तडीपार आरोपीचे नाव असून, कृष्णा ज्ञानोबा गायकवाड (वय 40 रा. रामनगर, वारजे, पुणे) (Krushna Dnyanoba Gaikwad) असे प्रोव्हिबिशन कारवाई (Prohibition act) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

परिमंडळ 3 मधील एकुण 6 पोलीस स्टेशन हद्दीत घेण्यात आलेल्या या विशेष मोहिमे दरम्यान प्रोव्हिबिशनमध्ये एकुण 11 केसेस करुन 11 आरोपींकडुन 19 हजार 90 रुपयांचा प्रोव्हिबिशन मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात दंगा करणारे (Rioters), रात्रीच्या वेळी वाहन तोडफोड करणारे, दहशत निर्माण करणारे गुन्हेगार (Terrorist Criminals) यांची नव्याने यादी तयार करण्यात आलेली असुन, त्यांचेवर पुणे शहर पोलीसांकडुन कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे.

 

 

सदरील कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार यांचे आदेशान्वये, पोलीस सह-आयुक्त संदीप कर्णिक (Joint Commissioner of Police Sandeep Karnik), पुणे शहर अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील (Additional Commissioner of Police Pravin Patil), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (Additional Commissioner of Police Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Crime Ramnath Pokle), पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 1 संदीप सिंह गिल्ल (DCP Sandeep Sinha Gill), पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे (DCP Shankar Borate), पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), पोलीस उप-आयुक्त वाहतुक विभाग विजयकुमार मगर (DCT Traffic Vijaykumar Magar) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व पोलीस ठाणेकडील अधिकारी / अंमलदार तसेच वाहतुक विभागाकडील अधिकारी / अंमलदार यांचे पथकाने संयुक्तपणे उपरोक्त कामगिरी केली आहे. यापुढेही कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येवून गुन्हेगारांचे हालचालीवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.