Type Here to Get Search Results !

सिंहगड रोडवरील रहिवासी इमारतींच्या आर्थिग वायर चोरी करणारे दोघे गजाआड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

sinhgad road police station earthing wire burgler


 

पुणे, दि. 14 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रोड पोलीस स्टेशन (Sinhgad Road Police Station) हद्दीतील रहिवासी इमारतींमधील (Residential Buildings) विजेच्या उपकरणांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या महागड्या आर्थिंग वायर चोरणाऱ्या दोघांना अटक (Earthing Wire Thiefs Arrested) करण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 30 हजार रुपये किंमतीची वायर आणि गुन्हयात वापरलेली 50 हजार रुपये किंमतीची स्कूटर असा एकुण 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील (Detection Branch) पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार आर्थिंग वायर चोरी प्रकरणातील संशयितांचा शोध घेत असताना, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार देवा चव्हाण (Deva Chavan) आणि स्वप्निल मगर (Swapnil Magar) यांना त्यांचे खास खबऱ्याकडून माहिती मिळाली की, नऱ्हे (Narhe) मधील जेएसपीएम कॉलेज (JSPM College) जवळ असलेल्या दुर्वाकुर सुष्टी (Durvakur Srushti) या ठिकाणी आर्थिगची वायर चोरी करणारे संशयित पांढऱ्या रंगाच्या वेस्पा स्कूटरवर (White Vespa) नवले पुलाखाली (Navale Bridge) थांबलेले आहेत. यानंतर अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, प्रविण कुमार पाटील (Additional Commissioner of Police Pravinkumar Patil), परीमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Sinhgad Road Rajendra Galande), वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior PI Abhay Mahajan), पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर (Crime PI Jayant Rajurkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam), पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh Mokashi), पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, राजाभाऊ वेगरे, दक्ष पाटील, विकास पांडुळे, अमोल पाटील, सागर शेडगे, विकास बांदल, अविनाश कोडे, यांच्या पथकाने सापळा रचून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.

 

 

त्यांना ताब्यात घेवुन विश्वासात घेत, त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी 8 ते 10 दिवसांपूर्वी दुर्वाकुर सुष्टी याठिकाणी चोरी केली असल्याचे कबुल केले. सदर आरोपींकडे पोलीस कोठडी मध्ये अधिक तपास करता त्यांनी चोरी केलेली 30 हजार रुपये किंमतीची वायर व त्यांनी गुन्हयात वापरलेली 50 हजार रुपये किंमतीची वेस्पा स्कूटर असा एकुण 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी करत आहेत. रविंद्र प्रकाश देशमुख (वय 34 वर्षे, मुळगाव - शाहुनगर, माजलगाव, बिड, सध्या रा. काळुबाई निवास, वेताळबुवा चौक, नऱ्हे, पुणे) (Ravindra Prakash Deshmukh) आणि हेमराज शांताराम पाटील (वय 27 वर्षे, मुळगाव बोळे, पारुळा, जि. जळगाव, सध्या रा. श्री एव्हेन्यु, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) (Hemraj Shantaram Patil) अशी या चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.